राज्यातील ‘बळी’राजाची अस्वस्थ करणारी आकडेवारी; 5 महिन्यात 1,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चर्चेच्या मुख्य प्रवाहातून बाजूला गेलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या विषयासंदर्भात अस्वस्थ करणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात पाच महिन्यात झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी मांडली. जून ते ऑक्टोबर कालावधी 1 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लेखी उत्तरात माहिती दिली. मावळत्या वर्षात म्हणजे 2021 मधील पाच महिन्यांच्या कालावधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली.

राज्य सरकारच्या माहितीप्रमाणे जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात 1076 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. आत्महत्या केलेल्या 1076 शेतकऱ्यांपैकी 491 मयत शेतकरी सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर 213 शेतकरी अपात्र ठरले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे 312 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणं जिल्हा पातळीवरील पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत दिली जाते. आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आणि पात्र ठरलेल्या राज्यातील 491 मयत शेतकऱ्यांपैकी 482 शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचं वाटप करण्यात आलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत देण्यात आली असल्याचं वडेट्टीवार यांनी लेखी उत्तर म्हटलं आहे.

देशात 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला मारली मिठी

ADVERTISEMENT

देशातील चालू वर्षात शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी अजून समोर आलेली नाही. मात्र, 2020 मध्ये देशभरात 5 हजार 579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर, चालू वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे चक्रीवादळं, महापूर, पूर, भूस्खलन, ढगफुटी आदी कारणांमुळे पाच मिलियन हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT