पुणे : ‘लिव्ह इन’मध्ये असताना झाला बाप, 13 दिवसांच्या बाळाला संपवलं; अडीच वर्षांनी फुटलं बिंग

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यात 13 दिवसांच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी बापाला अटक करण्यात आली आहे. 2018 पासून ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’मध्ये राहणार्‍या तरुणीच्या बाळाला अनाथालयात सोडतो, असं सांगून बाळाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल अडीच वर्षानी उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळाच्या बापाला अटक करण्यात आली आहे.

शुभम महेश भांडे (वय 22 रा. वडगावशेरी) आणि योगेश सुरेश काळे (वय 23 रा.मांजरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंडवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम आणि मुलगी 2017 पासून एका कंपनीत कामाला होते.

त्या दोघांची सुरुवातीला मैत्री होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालावधी नंतर दोघे एकत्रित राहू लागले. याचदरम्यान प्रेम संबंधातून 14 मार्च 2019 रोजी तरुणीने बाळाला जन्म दिला. त्या बाळाच्या जन्मानंतर आरोपी शुभम हा बाळाच्या आईला म्हणाला, ‘आपल्या दोघांच्या भविष्यासाठी बाळाला अनाथालयात सोडून येतो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर 28 मार्च रोजी रूग्णालयामधून डिस्चार्ज मिळताच आरोपी शुभम बाळाला घेऊन गेला. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने बाळाच्या आईला सांगितलं की, ‘बाळाला अनाथालयात सोडून आलो.’

ADVERTISEMENT

नंतरच्या काळात बाळाची आई वेळोवेळी आरोपी शुभम याच्याकडे बाळाबद्दल चौकशी करायची. त्यावर बाळ ठीक असल्याचं तो सांगायचा. आपण बाळाला भेटूयात अशी अनेक वेळा आरोपीकडे मागणी केली. पण त्यावर त्याने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तर दिली. यामुळे महिलेला बाळाचं बरं वाईट तर केलं नसेल, असा संशय आला. नंतर तिने चंदननगर पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.

ADVERTISEMENT

बाळाच्या आईचं म्हणणं ऐकल्यानंतर आरोपी शुभम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता. ज्यावेळी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आश्रमात सोडतो असे सांगितले.पण मी बाळाला योगेश काळे या मित्रासोबत विमानतळ परिसरात असलेल्या दाट झाडीमध्ये घेऊन गेलो आणि तिथे टाकून दिलं. ही घटना काही युवकानी पाहिली. त्या वेळी तिथे असलेल्या व्यक्तीसोबत भांडणही झालं. पण मी तेथून पसार झालो, अशी कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. बाळाच्या काही वस्तू देखील आढळून आल्या असून, त्या तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आल्याचं मुंढवा पोलिसानी सांगितले. सध्या आरोपी युवक आणि त्याचा मित्र पोलीस कोठडीमध्ये आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT