50 रूपये चोरल्याच्या रागातून वडिलांनी मुलाला कवटी फुटेस्तोवर बडवून केली हत्या, ठाण्यातली घटना

ठाण्यातल्या कळवा भागातली धक्कादायक घटना
50 रूपये चोरल्याच्या रागातून वडिलांनी मुलाला कवटी फुटेस्तोवर बडवून केली हत्या, ठाण्यातली घटना
ठाण्यातल्या कळवा भागातली घटना (प्रातिनिधिक फोटो)

विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे

50 रुपये चोरले म्हणून बापाने आपल्याच 10 वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनाम्याला सुरुवात केली.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब ही आहे की जेव्हा वडिलांना समजलं की मुलाने पैसे चोरले आहेत तेव्हा त्यांनी त्याला कवटी फुटेपर्यंत मारलं. या मारहाणीतच त्या मुलाचा मृत्यू झाला.

ठाण्यातल्या कळवा भागातली घटना
Crime: अवघ्या 3 वर्षाच्या पुतणीची काकूने केली हत्या, 5 दिवस मृतदेह ठेवलेला गव्हाच्या कोठीत

या दरम्यान पोलिसांना मुलाचा मृतदेह एका चादरीत जखमी अवस्थेत गुंडाळलेला आढळून आला. करण प्रजापती असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून त्याला 50 रुपये चोरले म्हणून त्याला वडिलांनी मारहाण केल्याची माहिती करणच्या बहिणीने पोलिसांना दिली. दारूच्या नशेत बापाने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली.

ठाण्यातल्या कळवा भागातली घटना
भिवंडी : मटण कापायच्या सुरीने पत्नीवर वार करत हत्या, तळ्यात उडी मारुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे त्या निर्दयी बापाचे नाव असून तो मद्यपी (अट्टल दारुडा) आहे. त्यानंतर पोलिसांनी करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवत आणि निर्दयी बापाला ताब्यात घेतले. मुलाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा, त्याचबरोबर मुलाला झालेल्या अमानुषपणे मारहाणीत त्याचे दोन्ही हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच डोक्याची कवटी फुटल्याने करणचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० डिसेंबर रोजी निर्दयी बापाला अटक करून त्याच्या विरोधात भादवी ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in