Corona: तिसऱ्या लाटेची प्रचंड भीती, जीवनावश्यक वस्तू संपू लागल्या; प्रचंड वाढली ऑनलाइन विक्री

fear of corona third wave essential goods started disappearing online sales increased by 15 percent in a week
fear of corona third wave essential goods started disappearing online sales increased by 15 percent in a week(फाइल फोटो)

मुंबई: भारत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona 3rd Wave) उंबरठ्यावर आहे. गेल्या 7 दिवसात कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू (Night Curfew) आता लागू केला आहे. या सगळ्याचा परिणाम लोकांच्या खरेदीवर होत असून, बाजारात पुन्हा घबराटीचे वातावरण (Panic Buying) पाहायला मिळत आहे. त्यामुळे किराणा दुकानं आणि ई-कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू गायब होऊ लागल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट आणि लॉकडाऊनच्या भीतीने गेल्या काही दिवसांत जीवनावश्यक वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या या लाटेत संसर्गाचा वेग खूपच वेगवान आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कधीही होऊ शकतं या भीतीने आता लोक बाजारात खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. दुसरे कारण म्हणजे बाजार उघडण्याच्या वेळेवर घालण्यात आलेले निर्बंध. उदाहरणार्थ, दिल्लीत, बाजार सम-विषम दिवशी आठ वाजेपर्यंत उघडत आहे. यामुळे लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ऑनलाइन मार्केट प्लेसला प्राधान्य देत आहेत.

ईटीच्या एका अहवालानुसार, जवळपास सर्वच श्रेणींमध्ये ऑनलाइन विक्री मागील काळात 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर चॉकलेट आणि शीतपेय उत्पादनांसह साबण, शाम्पू, स्वच्छता उत्पादने, खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे.

तसेच सॅनिटायझर, N95 मास्क इत्यादींच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे यावेळेस कंपन्यांनी आधीच्या दोन लाटांमध्ये शिकून बरीच तयारी केली आहे. अचानक मागणी वाढल्या पुरवठा कसा करता येईल याची पूर्ण तयारी आता विविध कंपन्यांनी केली आहे.

रिपोर्टनुसार, Parle Products प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह यांनी सांगितले की, 'गेल्या काही दिवसांत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विक्री 10-15 टक्क्यांनी वाढली आहे. जोपर्यंत तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील तोपर्यंत ही गती कायम राहील.' असे शहा यांना वाटते.

Blinkit च्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, 'सीलबंद केलेले अन्न आणि स्वच्छता उत्पादनांची विक्री गेल्या आठवड्यात दुप्पट झाली आहे. त्याच वेळी, N95 मास्कची विक्री आठवड्यात पाच पटीने वाढली आहे.'

fear of corona third wave essential goods started disappearing online sales increased by 15 percent in a week
Covid 19 : कोरोना रडवतोय! मुंबईत दिवसभरात 15 हजार 166 रूग्णांची नोंद

24 तासात सापडले तब्बल 90 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 90 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एका दिवसापूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे दुप्पट आहे. आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे 2,630 पर्यंत रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सर्वात वेगाने वाढत आहेत. गेल्या 24 तासात नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 67 टक्के रुग्ण हे या पाच राज्यांमध्येच आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in