Aryan सोबत जे घडलं ते कोणत्याही आईसाठी दुःखाचा विषय - सुप्रिया सुळे

Aryan सोबत जे घडलं ते कोणत्याही आईसाठी दुःखाचा विषय - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांची नाव न घेता समीर वानखेडेंवरही टीका

ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB ने अटक केलेल्या आर्यन खानला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतू या प्रकरणात NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांचं जातप्रमाणपत्र बोगस असल्याचाही आरोप केला. आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आर्यन खानबाबत जे घडलं ते एक आई म्हणून वाईट वाटतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या परिवारात गेल्या काही दिवसांपासून जो वादविवाद सुरु आहे त्याबद्दल सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी, "मी एक आई म्हणून सुरुवातीला उत्तर देऊ इच्छिते नंतर मी लोकप्रतिनीधी म्हणून बोलेन. एक आई म्हणून किंवा कुठल्याही आईसाठी हा दुःखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात असं झालं असतं तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही अशी माहिती समोर येतेय. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि तरीही त्याला २६ दिवस जर जेलमध्ये रहावलागत असेल तर समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन करायला हवं", अशी प्रतिक्रीया दिली.

Aryan सोबत जे घडलं ते कोणत्याही आईसाठी दुःखाचा विषय - सुप्रिया सुळे
Cruise Drugs Case: अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना तुरुंगात का राहावं लागलं आर्यनपेक्षा एक दिवस जास्त?

केंद्र सरकारने या प्रकरणात उत्तर दिलं पाहिजे. अशा चुकीच्या गोष्टींमुळे बॉलिवूड आणि देशाचं नाव बदनाम होतं. एक अधिकारी चुकीचं काम करत असल्यामुळे देशभरात नाव बदनाम होतं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी समीर वानखेडेंवरतीही निशाणा साधला. यावेळी सुप्रिया सुळेंनी नबाब मलिक यांची पाठराखण केली.

'एनसीबीने कशाप्रकारे केसेस उभ्या केल्यात याची पोलखोल नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी केले आरोप हे योग्यच आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष मलिकांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Aryan सोबत जे घडलं ते कोणत्याही आईसाठी दुःखाचा विषय - सुप्रिया सुळे
Chandrakant Patil: 'मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला?' चंद्रकांत पाटलांचा पुन्हा नवाब मलिकांवर निशाणा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in