Mumbai Tak /बातम्या / VIDEO: हनुमानाच्या प्रतिमेसमोरच ‘बिकिनी शो’, झाला प्रचंड गोंधळ
बातम्या राजकीयआखाडा

VIDEO: हनुमानाच्या प्रतिमेसमोरच ‘बिकिनी शो’, झाला प्रचंड गोंधळ

Women walk two pieces in front of lord hanuman Statue : हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपा (BJP) नेहमीच आक्रमक पावित्रा घेत असते. आता पठाण (Pathaan) चित्रपटाचाच मुद्दा घ्या, दिपिकाच्या भगव्या बिकनीवर राजकारण टोकाला पोहोचले होते. या सर्व घटना ताज्या असतानाचा आता एका भाजप नेत्याने बॉडी बिल्डींग (Body Building) स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत महिला बॉडी बिल्डर हनुमानाच्या (Lord Hanuman) प्रतिमेसमोरच बिकिनीत पोज देताना दिसल्या होत्या. या संदर्भातले फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओनंतर कॉंग्रेसने (congress) या घटनेवर आक्षेप घेतला आहे. तसेच भाजपावर अश्लीलता पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजपाने कॉग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. या घटनेमुळे कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जूंपली आहे. (female body building contest walk in bikini lord bajrangbali statue video controversy madhya pradesh ratalam)

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये भाजप नेत्याकडून ज्यूनियर बॉडी बिल्डींग (Body Building) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भगवान हनुमानची (Lord Hanuman) प्रतिमा स्टेजवर ठेवण्यात आली होती. या प्रतिमेसमोर काही मुली बिकिनीत बॉडी बिल्डींगचे पोज देत होत्या. या स्पर्धेतले काही व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडिओला ट्विट करत कॉंग्रेसने भाजपावर निषाणा साधला होता. तसेच भाजप नेत्याकडून अश्लीलता पसरवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…

आरोप काय?

कॉंग्रेस नेता मयंक जाट आणि प्रदेश कॉंग्रेसचे महामंत्री पारस सकलेचा यांनी निवेदन जारी करून भाजपाच्या भूमिकेचा निषेध केला होता. भाजप नेत्यांनी भगवान बजरंगबलीच्या मुर्तीसमोर सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. तसेच पठाण सिनेमाच्या गाण्यावर गदारोळ करणारे भाजपचे महापौर आणि पक्षाचे नेते अशा कार्यक्रमाचे आयोजन करतायत? असा प्रश्न करत त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचेही म्हटले. त्यामुळे आता स्पर्धेचे आयोजन स्थळ गंगाजलने पवित्र करत हनुमान चालीसा (HanumaN Chalisa) पठण करण्याचा इशारा दिला.

Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत

कॉंग्रेस-भाजपामध्ये जुंपली

कॉंग्रेस नेत्याच्या या आरोपानंतर भाजपही आक्रमक झाली होती. भाजपने कॉंग्रेसवर नारी शक्तीचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजप नेत्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर अडीच तास भाजप ठिय्या देत होती. यानंतर पोलिसांनी 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान आता या प्रकरणात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये (Bjp vs Congress) जुंपल्याचे पाहायला मिळाले. तसेच भाजपच्या तक्रारीनंतर आता कॉंग्रेस नेत्यावर कारवाई होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा