Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / Crime: पाचव्या पत्नीने गुप्तांग कापून रस्त्यावर फेकला पतीचा मृतदेह
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime: पाचव्या पत्नीने गुप्तांग कापून रस्त्यावर फेकला पतीचा मृतदेह

Crime News: देशात पतीकडून पत्नीचा (wife) छळ केल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका पत्नीने पतीच्या छळाला कंटाळून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत पत्नीनेच पतीची हत्या करून पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तिने एकप्रकारे पोलीसांनाच आव्हान दिले होते. आता पोलिसांनी हे आव्हान स्विकारून घटनाक्रम कसा सोडवला आहे, हे जाणून घेऊयात.(fifth wife killed her husband fed up with harrassment shocking crime story madhya pradesh)

नेमकी घटना काय?

उर्ती (Urti village) गावात एका इसमाची हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला होता. या मृत व्यक्तीचे नाव बीरेंद्र गुर्जर होते. 21 फेब्रुवारीला त्याचा मृतदेह सापडला होता. या मृत व्यक्तीच्या गळ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे निषाण होते. पोलिसांनी (Police) हा मृतदेह ताब्यात घेऊन तपासास सुरुवात केली होती. यापुर्वी पत्नीने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होऊन अज्ञात आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

संदीप देशपांडे हल्ला: दोघांना भांडूपमधून घेतलं ताब्यात, नेमकं कनेक्शन काय?

मृतकाच्या पत्नीवरच संशय

कोतवाली पोलीसांनी (Kotwali Police)या घटनेचा तपास सूरू केला होता. पोलिसांनी मृतकांच्या नातेवाईकांशी आणि संशयीत व्यक्तीची चौकशी करायला सुरूवात केली होती.या चौकशीत त्यांना मृत व्यक्तीच्या पत्नीवर संशय बळावला होता. त्यामुळे त्यांनी पत्नी कांचन गुर्जरचा कसून तपास केला असता तिने हत्येची कबूली दिली. पत्नीने पतीसाठी रचलेला हत्येचा कट पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली होती.

असा रचला हत्येचा कट

आरोपी पत्नी कांचन गुर्जरने पोलीसांना (Kotwali Police) सांगितले की, पती बीरेंद्रला दारूचे व्यसन होते. या व्यसनातून तो तिचा छळ करून तिच्यावर अत्याचार करायचा. याच छळाला कंटाळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. 21 फेब्रुवारीच्या रात्री बीरेंद्रच्या जेवनात 20 झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. या गोळ्यांमुळे त्याला खुप झोप आली आणि यावेळी तिने त्याची हत्या केली.

Thane Crime: CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या

कांचनने गाढ झोपेत असलेल्या पतीच्या( husband) गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्यानंतर धारधार शस्त्राने पत्नीच्या गुप्तांगावर (प्रायव्हेट पार्ट) वार करत त्याची हत्या केली. बीरेंद्रची हत्या केल्यानंतर तिने मृतदेह कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी कांचने त्याचे कपडे आणि चप्पल जाळून टाकली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ही बीरेंद्रची पाचवी पत्नी होती. याआधी चार बायकांनी बीरेंद्रच्या छळाला कंटाळून त्याला सोडून दिले होते. कांचन सोबतही बीरेंद्र तसाच छळ करत होता. त्यामुळे या छळाला कंटाळून तिने बीरेंद्रची हत्या केली. बीरेंद्रच्या हत्ये प्रकरणी पोलीसांनी कांचनला ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सिंगरोली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना