15 दिवसांत खड्डे भरा नाहीतर तुम्हालाच खड्ड्यात भरु - मनसे आमदार राजू पाटलांचा प्रशासनाला इशारा

कल्याण-डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांचा प्रश्न चिघळणार
15 दिवसांत खड्डे भरा नाहीतर तुम्हालाच खड्ड्यात भरु - मनसे आमदार राजू पाटलांचा प्रशासनाला इशारा
कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची खराब अवस्था सध्या चर्चेचा विषय आहे

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकार्या समवेत पाहणी केली .यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. "आता सहनशीलतेचा अंत झालाय, 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू", असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिला.

यावेळी बोलत असताना आमदार पाटील यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनावरही टीका केली आहे.

कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची खराब अवस्था सध्या चर्चेचा विषय आहे
शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग लॉट ! ठाण्याची वाहतूक-कोंडी सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेचा मास्टरप्लान तयार

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसंच डांबरी  रस्त्याची यंदाच्या पावसाळयात  दुरावस्था झाली. काही रस्त्यावर तर जणू खड्ड्यांची स्पर्धा लागलेल्याचं चित्र दिसून येतेय. महापालिकेने खड्डे भरण्यासाठी तब्बल 114 कोटी खर्च केलेत मात्र अद्यापही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ कोटींच्या निविदा काढल्या होत्या. परंतू यंदाही पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था नेहमीप्रमाणे झाली आहे. असं असतानाही खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे, ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तक्रारी- निवेदनं, आंदोलनं करून देखील प्रशासन दाद देत नसल्याने आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत  कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची पाहणी केली.

कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी करताना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आगपाखड केली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व कल्याण डोंबिवली महापालिकेवर टीका केली. "रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आहे, अनेक महिन्यांपासून  रस्त्यांबाबत पाठपुरावा करत होतो मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळेच आज दौरा काढला. या रस्त्याचे 95 टक्के बिलिंग झाले मात्र त्या प्रमाणात काम झालेलं नाही. मुंबईत ब्लॅकलिस्ट केलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचं काम दिलं, सत्ताधारी सिंहाचा नव्हे तर वाघाचा वाटा खातात त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था झाली", अशी टीका पाटील यांनी केली.

आपल्या पाहणी दौऱ्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत येणं टाळलं. हे अधिकारी फक्त खुर्च्या ऊबवायला बसले आहेत का असा सवाल राजू पाटलांनी विचारला. ८ वर्षांत या रस्त्यावर ११४ कोटी खर्च झाले पण ते कुठेच दिसत नाहीयेत. अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करुन काहीही फरक पडत नाही असं म्हणत १५ दिवसांत खड्डे भरले नाही तर अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात भरु असा इशारा पाटील यांनी दिला.

Related Stories

No stories found.