'Kanhaiya Kumar म्हणजे रंग बदलणारा सरडा, उद्या भाजपमध्येही जाऊ शकतो'

'Kanhaiya Kumar म्हणजे रंग बदलणारा सरडा, उद्या भाजपमध्येही जाऊ शकतो'

फिल्म मेकर अशोक पंडित यांनी केली टीका

कन्हैय्या कुमार म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे. उद्या राहुल गांधींनी काढून टाकलं तर भाजपमध्येही जाऊ शकतो असं ट्विट फिल्ममेकर अशोक पंडित यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हीडिओही ट्विट केला आहे ज्या व्हीडिओत कन्हैय्या कुमार काँग्रेसवर टीका करताना दिसतो आहे.

नुकताच कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. अशात ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी कन्हैय्या कुमारचे काँग्रेसवर टीका करणारे व्हीडिओ ट्विट केले आहेत. या व्हीडिओमध्ये कन्हैय्या काँग्रेसवर टीका करताना दिसतो आहे. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैय्याने असं वक्तव्य केलं होतं की जर काँग्रेस वाचवलं नाही तर हा देश बुडेल. त्याच्या याच वक्तव्यावरून त्याला आता सोशल मीडियावर प्रतिप्रश्न विचारले जात आहेत.

कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी केलेला हा प्रवेश त्यांना अशा प्रकारे काँग्रेसमध्ये येऊ देणं हे अनेक जुन्या जाणत्या लोकांना मान्य झालेलं नाही. त्यामुळे त्यांना पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागतो आहे. अशात ट्विटरवर कन्हैय्या कुमारवर टीका सुरू झाली आहे.

अशोक पंडित यांनी याआधी राहुल गांधींच्याही एका ट्विटवरुन टोला लगावला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करत, 'आपण सर्व भारत असून द्वेषावर विजय मिळवू' असं म्हटलं होतं. यावर अशोक पंडित यांनी 'आमच्यासाठी काँग्रेसमुक्त भारतच भारत आहे' असा टोला लगावला होता. आता त्यांनी कन्हैय्या कुमार याला रंग बदलणारा सरडा म्हटलं आहे.

2016 मध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत देशविरोधी घोषणा देणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. त्याला अटक झाल्यानंतर तो या रॅलीत सहभागी होता का? lत्याने घोषणा दिल्या की नाही हे सगळं सिद्ध होऊ शकलं नाही. तो विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नव्हता तो होता कन्हैय्या कुमार. डाव्या विचारसरणीच्या कन्हैय्या कुमारने आता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचा काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.