'बाळकडु' सिनेमाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर अटकेत, बनावट डिग्रीद्वारे मनोरुग्णांचा करत होत्या इलाज

वांद्रे पोलिसांनी केली अटक, पाटकर यांना आज कोर्टासमोर हजर करणार
'बाळकडु' सिनेमाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर अटकेत, बनावट डिग्रीद्वारे मनोरुग्णांचा करत होत्या इलाज

मराठी चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये जॉब मिळवण्यासाठी बनावट Ph.D डिग्री मिळवल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत स्वप्ना पाटकर यांना अटक केली आहे.

२०१५ साली बनवण्यात आलेला बाळकडु या सिनेमाची निर्मीती केल्यानंतर स्वप्ना पाटकर पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या. एप्रिल महिन्यात गुरदीप कौर यांना पाटकर यांच्या बनावट डिग्रीप्रकरणी काही कागदपत्र मिळाली होती. ही कागदपत्र तपासली असता ती बनावट असल्याचं आपल्या लक्षात आल्याचं कौर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

त्या कागदपत्रावर अनेक स्पेलिंग आणि प्रिंटींग मिस्टेक होत्या. कानपूर येथील छत्रपती शाहुजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनीकल फिजीओलॉजी चं डिपार्टमेंटच नसल्याचं माझ्या लक्षात आलं. याच डिग्रीच्या आधारावर पाटकर वांद्रे पश्चिम येथील एका नामांकित रुग्णालयात honorary consultant म्हणून मनोरुग्णांवर उपचार करत होत्या.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी पाटकर यांच्याविरोधात IPC च्या ४१९, ४२०. ४६७, ४६८, ४७१ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाटकर यांना अटक करण्यात आलं असून बुधवारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल अशी माहिती झोन ९ चे DCP अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in