...आणि Aryan Khan च्या चेहऱ्यावर हसू आलं, जामिनाची बातमी समजताच म्हणाला थँक्स !

आर्यन खानसोबत मुनमुन धामेचा आणि अरबाझ मर्चंट यांचाही जामीन मंजूर
...आणि Aryan Khan च्या चेहऱ्यावर हसू आलं, जामिनाची बातमी समजताच म्हणाला थँक्स !
(फाइल फोटो)

तब्बल २७ दिवसांनी NCB च्या अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई हायकोर्टात आज झालेल्या सुनावणीत जस्टीस सांबरे यांनी आर्यन खानसह मुनमुन धामेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर केला. आर्यनला आज जामीन मंजूर झाला असला तरीही त्याची लगेच आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार नाहीये.

न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर उद्या किंवा शनिवारपर्यंत आर्यन तुरुंगाबाहेर येणार असल्याची माहिती त्याचे वकील मुकुल रहतोगी यांनी दिली. दरम्यान आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी संध्याकाळी उशीरा त्याला जेलमध्ये देण्यात आली.

...आणि Aryan Khan च्या चेहऱ्यावर हसू आलं, जामिनाची बातमी समजताच म्हणाला थँक्स !
आर्यन खानची अटक ते जामीन, 25 दिवसात काय काय घडलं? वाचा सविस्तर

संध्याकाळी सहा वाजता सर्व कैद्यांना जेलमध्ये जेवणं देण्यात येतं. याचदरम्यान आर्यनला त्याला जामीन मिळाल्याबद्दल सांगण्यात आलं. आपल्या जामीनाबद्दलची बातमी ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असून त्याने ही बातमी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला थँक्स असं म्हटलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जामीनाची बातमी समजल्यानंतर आर्यन खान तुरुंगात आनंदी असल्याचं कळतंय. इतकच नव्हे तर इतक्या दिवसांमध्ये त्याच्यासोबत कैदेत असलेल्या काही जणांना त्याने आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिल्याचंही समजतंय.

जस्टीस नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने आर्यनला जामीन मंजूर केला असला तरीही याबद्दलच्या Operative Order शुक्रवारी जारी करण्यात येतील. या ऑर्डर जारी झाल्यानंतर पुढील काही तासांमध्ये आर्यन खान तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात जामीन मिळत नसल्यामुळे दुःखी होता.

...आणि Aryan Khan च्या चेहऱ्यावर हसू आलं, जामिनाची बातमी समजताच म्हणाला थँक्स !
Aryan Khan Bail : जामीन मिळूनही आर्यनला आजचा मुक्कामही करावा लागणार तुरुंगातच

तुरुंगात बाहेरचं जेवण मिळण्याची सोय नसल्यामुळे आर्यनला तुरुंगातल्या जेवणावर दिवस काढावे लागत होते. आर्यनसोबत अटकेत असलेल्या अरबाझ मर्चंटच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन अनेक दिवस फक्त बिस्कीट काढून दिवस काढत होता. आर्यनसोबत अटकेत असलेल्या अरबाझचं या दिवसांमध्ये ७ किलो वजन कमी झाल्याचीही माहिती त्याच्या वडीलांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात आर्यन खान तुरुंगात धार्मिक विषयावरची पुस्तक वाचून वेळ काढत होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in