Advertisement

Flipkart Cooling Days Sale: AC वर बंपर डिस्काउंट, तब्बल 42% पर्यंत सूट

Flipkart Cooling Days Sale: फ्लिपकार्टने उन्हाळ्यात खास आपला Cooling Days Sale सुरु केला आहे. पाहा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंवर किती सूट मिळणार आहे.
flipkart cooling days sale discounts on split window ac up to 42 percent discount
flipkart cooling days sale discounts on split window ac up to 42 percent discount

Flipkart Cooling Days Sale: फ्लिपकार्टने आपला खास Flipkart Cooling Days Sale सुरु केला आहे जो 26 मार्चपर्यंत असणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये उन्हाळ्यातील सर्वोत्तम डील दिल्या जात आहेत. या सेलमध्ये तुम्ही अगदी कमी किंमतीत AC देखील खरेदी करू शकता.

अपफ्रंट डिस्काउंट व्यतिरिक्त, कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI व्यवहारांवर अतिरिक्त 10% सूट देखील देत आहे. येथे आम्ही तुम्हाला एसी वर मिळू शकणार्‍या सर्वोत्तम डीलबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही सेल दरम्यान खरेदी करू शकता.

Blue Star 0.8 Ton 3 Star Split Inverter AC

जर तुमच्या खोलीचा आकार लहान असेल तर तुम्ही Blue Star चा 0.8 टन एसी खरेदी करू शकता. कंपनीने यावर तब्बल 26% डिस्काउंट देऊ केलं आहे. त्यामुळे ही एसी आपल्याला 27,490 रुपयांना मिळणार आहे. हा 3-स्टार एसी आहे. यामध्ये स्लीप मोड, ऑटो रिस्टार्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ONIDA 1 Ton 3 Star Split Inverter AC

ONIDA 1 Ton 3 Star Split Inverter AC Flipkart वर तब्बल 42% सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा एसी फक्त 25,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. 3 स्टार BEE रेटिंग 2021 सह हा एसी आहे. कंपनीने यामध्ये टर्बो कुलिंगचा वापर केला आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे गरम हवा लवकर खोलीतून बाहेर पडते आणि खोली थंड होते.

Voltas 1.5 Ton 3 Star Split Inverter AC

Voltas 1.5 Ton 3 Star Split Inverter AC वरही सूट दिली जात आहे. कंपनीने हा एसी 37% डिस्काउंटसह 38,990 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. हा एसी 3 स्टार BEE रेटिंग 2022 सह उपलब्ध आहे. जो 15% ऊर्जा वाचवतो.

flipkart cooling days sale discounts on split window ac up to 42 percent discount
भन्नाट फीचर्स असलेला Noise चा नवा स्मार्टवॉच

Voltas 1.5 Ton 5 Star Window AC

कंपनी विंडो एसीवर देखील भरघोस सूट देत आहे. Flipkart Cooling Days Sale मध्ये, Voltas 1.5 Ton 5 Star Window AC 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही 5 Star BEE Rating 2019 उपलब्ध आहे. जी जवळजवळ 25% टक्के वीज बचत करते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in