माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार? कोर्टाकडून फौजदारी आरोप निश्चित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणुकीच्या अर्ज दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी सादर केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या विरुद्ध प्रलंबित असलेले दोन फौजदारी गुन्हे यांची माहिती लपवून ठेवलेली होती.

याप्रकरणी नागपुरातील वकील सतिष उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अॅडव्होकेट सतीश उके यांची तक्रार योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. तसंच हे प्रकरण नागपुरातील कनिष्ठ न्यायालयात चालवण्यासाठी सांगितलेले होते. त्यानुसार प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे चार्जेस फ्रेम करण्यात आले हे चार्जेस लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 नुसार मान्य आहेत का अशी विचारणा न्यायालयाने फडणवीस यांचे वकील उदय डबले यांना केली त्यावर त्यांनी हा गुन्हा मान्य नसल्याचे न्यायालयात सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT