Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट, तोषखाना प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण इम्रान खान विरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तोषखाणा प्रकरणात (Toshakhana Case)त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इस्लामाबादच्या आयजींनी आजच इम्रान खानला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र आज इम्रानला अटक होण्याची शक्यता नाही. (former pakistan pm imran khan likely to be arrested in toshakhana case)

तोषखाणा प्रकरणात गैरहजर

इम्रान खानला (Imran Khan) 28 फेब्रुवारीला अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात हजर व्हावे लागले होते. यामध्ये परदेशी फंडींग प्रकरण, दहशतवादी संबंधित खटला, खुनाचा प्रयत्न आणि तोषखाना प्रकरणांचा (Toshakhana Case) समावेश होता.या प्रकरणांची सुनावणी वेगवेगळ्या कोर्टात पार पडली होती. अनेक प्रकरणात त्यांना दिलासाही मिळाला होता, मात्र तोषखाणा प्रकरणात ते अडचणीत सापडले होते. खरं तर तोषखाणा प्रकरणात ते हजरच झाले नाही. त्यामुळे न्यायालय संतप्त झाले आणि त्यांनी इम्रान खानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला. त्यामुळे इम्रानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Gautam Adani : अदानी कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत, महत्त्वाचं कारण आलं समोर…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

28 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी माजी पंतप्रधानांचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे इस्लामबाद पोलीस रविवारी तोषखाणा प्रकरणात (Toshakhana Case) अटक वॉरंट घेऊन इम्रान खानच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले होते. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. पोलीस अधिक्षक इम्रान घरी पोहोचले तेव्हा इम्रान खान तेथे आढळले नाहीत. त्यामुळे आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

तोषखाना प्रकरण नेमकं काय?

तोषखाना (Toshakhana Case)मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे. या विभागात सरकार आणि राष्ट्रप्रमुखांना इतर देशांच्या परदेशी पाहूण्यांकडून भेट स्वरूपात देण्यात येणाऱ्या मौल्यवान भेटवस्तू ठेवल्या जातात. नियमानूसार भेट स्वरूपात मिळालेल्या या वस्तु तोषखाण्यात ठेवणे आवश्यक असते. पण इम्रान खान यांनी या वस्तु स्वस्तात विकत घेऊन खुप मोठा नफा कमावला होता.

ADVERTISEMENT

2018 मध्ये इम्रान खान (Imran Khan) पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. यावेळी अरब देशांच्या दौऱ्यामध्ये त्यांना तेथील राजकिय नेत्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांना अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून मौल्यवान भेटवस्तूही देण्यात आल्या होत्या. ज्या इम्रानने तोषखान्यात जमा केल्या होत्या. पण नंतर इम्रान खानने त्या वस्तू तोषखान्यातून स्वस्तात विकत घेतल्या आणि भरघोस नफ्यात विकल्या होत्या. त्यांच्या सरकारने या संपुर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती.

ADVERTISEMENT

Sanjay Jadhav : आदित्य ठाकरेंमुळे शिंदेंचं बंड?, जाधवांनी ठाकरेंना दिला घरचा आहेर

दरम्यान या प्रकरणात इम्रान खानविरोधात (Imran Khan) अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आला आहे. आज तर पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आता त्यांना इस्लामबाद पोलिस कधीपर्यत अटक करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT