पंढरपूर पोटनिवडणुकीच्या ड्युटीनंतर एका शिक्षकासह घरातल्या चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर आता या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ लागला आहे. निवडणुकीनंतर आणि निकालानंतर अनेकांना कोरोनाची लागण होते आहे ही बाब समोर आली आहे. निवडणूक ड्युटी लागलेल्या एका शिक्षकाचा आणि त्याच्या घरातील अन्य तीन सदस्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात ही घटना घडली आहे.

पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यात घेरडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद माने यांना मतदानाची ड्युटी लागली. तिथून परतल्यावर त्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई , वडील व मावशी या सगळ्यांना कोरोना झाला. प्रमोद यांच्यावर आधी सांगोला या ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्बेत खालावली. त्यांना मुंबईत उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर त्यांचे वडील वसंत माने, आई शशिकला माने व मावशी जया घोरपडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रमोद यांची पत्नी आणि मुलगा या दोघांनी कोरोनावर मात केली. मात्र प्रमोद माने यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचं कोरोनामुळे निधन झालं त्यानंतर या ठिकाणी पोट निवडणूक लागली. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके हे होते तर भाजपने समाधान अवताडे यांना तिकिट दिलं. समाधान अवताडे यांचा या निवडणुकीत विजय झाला. ही निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके का हरले आणि भाजपचे समाधान आवताडे का जिंकले वाचा कारणं

ADVERTISEMENT

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातल्या या निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळातही चांगलीच रंगली होती. तसंच या ठिकाणी झालेल्या प्रचारसभांना गर्दीही झाली होती. मग ती राष्ट्रवादीच्या नेत्यांची सभा असो की भाजपच्या नेत्यांची. या निवडणुकीनंतर या ठिकाणी कोरोना वाढू लागला. याच वाढत्या कोरोनाचा फटका येथील लोकांना बसू लागला आहे. शिक्षक प्रमोद माने आणि त्यांच्या घरातले आणखी तीन सदस्य असे चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT