फेसबुकवर मैत्री अन् प्रेम… लग्नाआधीच नवरदेवाचं संपूर्ण कुटुंब संपलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोटा (राजस्थान): राजस्थानमधील कोटा येथील नयापूरा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या चंबळच्या छोट्या पुलावर रात्री उशिरा मिरवणुकीसह लग्नासाठी जाणारी कार नदीत पडली. यामध्ये नवरदेवासह 9 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. किशनलाल यांच्या मुलाची मिरवणूक बरवडा येथून दुपारी 2:00 वाजता इंदूरकडे रवाना झाली. येथे नवरदेवाच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने कार थेट चंबळ नदीत कोसळली. नवरदेवाच्या कुटुंबासह अनेकजण वरातीला गेले होते. ज्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन प्रेम जुळलं अन्..

नवरदेव अविनाश हा जयपूरमध्ये काम करायचा. फेसबुकच्या माध्यमातून त्याची इंदूरच्या एका तरुणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. एवढंच नव्हे तर त्या दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मान्य केला. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लग्नाच्या आदल्या दिवशी बरवाडा येथून वरात घेऊन अविनाश आणि त्याच्या कुटुंबातील जवळजवळ सर्वच जण हे इंदूरकडे निघाले पण कोटानजीक त्यांची कार थेट नदीत कोसळली आणि त्यात 9 जणांना जलसमाधी मिळाली.

कारचा दरवाजा न उघडल्याने सर्वांचा मृत्यू

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या कुटुंबातील लोकं रात्री उशिरा सवाई माधोपूरहून मिरवणूक घेऊन उज्जैनला जात होते. दरम्यान, कोटा येथील नयापुरा कल्व्हर्टवरून कारचे नियंत्रण सुटून ती चंबळ नदीत कोसळली.

ADVERTISEMENT

कारमधील लोकांनी दरवाजा, काच उघडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एकच काच उघडता आली. त्यामुळे 7 जणांचा कारमध्येच मृत्यू झाला. तर उर्वरित 2 जणांचे मृतदेह नदीपासून लांब दुसऱ्या किनाऱ्यावर सापडले.

दरम्यान, सकाळी स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या डायव्हिंग टीमने आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम एमबीएस रुग्णालयात सुरू आहे.

कार अपघातात बळी पडलेल्या लोकांची नावे

  1. अविनाश वाल्मिकी, नवरदेव, चौथचा बारवडा येथील रहिवासी

  2. केशव, नवरदेवाचा भाऊ, चौथचा बारवडा येथील रहिवासी

  3. इस्लाम खान, कार चालक, चौथ का बरवडा

  4. कुशल, (रा. जयपूर)

  5. शुभम, (रा. जयपूर)

  6. राहुल, (रा. जयपूर)

  7. रोहित, (रा. जयपूर)

  8. विकास, (रा. जयपूर)

  9. मुकेश, (रा. जयपूर)

भरधाव कार ट्रेलरवर आदळली; पती-पत्नीसह पाच महिन्याच्या मुलाचा मृत्यू

दरम्यान, पोलीस आणि नगर परिषदेच्या पथकाने बचावकार्य करत सुमारे 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व मृतदेह व गाडी बाहेर काढली. पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची माहिती गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT