
CDS Bipin Rawat Helicopter Crash: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय वायुसेनेच्या या हेलिकॉप्टरचे पायलट ग्रुप कॅप्टन पीएस चौहान आणि स्क्वाड्रन लीडर कुलदीप हे होते. हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांच्या पत्नी आणि कर्मचारी यांच्यासह एकूण 14 जण होते.
पाहा बिपीन रावत दिल्लीहून निघाल्यानंतर काय-काय घडलं
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे सकाळी नऊ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून तामिळनाडूला त्यांच्या पत्नीसह रवाना झाले होते.
ते 11.35 वाजता सुलूर येथील एअरफोर्स स्टेशनवर आले.
सीडीएस बिपिन रावत यांच्यासह एकूण 14 लोक येथून वेलिंग्टनला जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केलं.
यानंतर काही वेळातच रात्री 12:20 वाजता कुन्नूरमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
लोकवस्तीचा परिसर जवळ असल्याने स्थानिक लोक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातानंतर नेमकं काय-काय झालं याबाबत जाणून घेऊया सविस्तर
जाणून घ्या हेलिकॉप्टर अपघातानंतर काय झालं?
दुपारी 1:17 वाजता: कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली, ज्यामध्ये सीडीएस रावत देखील उपस्थित होते. तिघे जण अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत सापडले होते.
दुपारी 1:48 वाजता: हवाई दलाने सीडीएस रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
दुपारी 2:11 वाजता: कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातात चार मृतदेह सापडले होते. तिघे जण आधीच गंभीर जखमी अवस्थेत सापडले होते.
दुपारी 2:24 वाजता: बातमी आली की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी संसदेत निवेदन देणार आहेत.
दुपारी 2:56 वाजता: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना सर्व वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देश दिले.
दुपारी 2:57 वाजता: बातमी आली की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे कुन्नूरला जाऊ शकतात.
दुपारी 3.08 वाजता: तब्बल 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दुपारी 3.49 वाजता: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले.
संध्याकाळी 4:11 वाजता: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवार (9 डिसेंबर) संसदेत हेलिकॉप्टर अपघाताबाबत निवेदन देणार असल्याची माहिती मिळाली.
संध्याकाळी 4:43 वाजता: लष्करप्रमुख जनरल नरवणे सीडीएस बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले.
संध्याकाळी 4:53 वाजता: CDS हेलिकॉप्टर दुर्घटनेत 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.
संध्याकाळी 4:55 वाजता: हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाईल.
संध्याकाळी 5:07 वाजता: 6.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी CCS बैठकीची बातमी आली.
संध्याकाळी 6:07 वाजता: सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली. हवाई दलाने त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.
संध्याकाळी 6:12 वाजता: CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली.
संध्याकाळी 6:46 वाजता: राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी CDS बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली.
संध्याकाळी 7:03 वाजता: CDS बिपिन रावत आणि इतरांचे मृतदेह गुरुवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचण्याची अपेक्षा आहे.
संध्याकाळी 7:41 वाजता: CCS मिटिंग संपली. त्यानंतर पीएम मोदी आणि अमित शहा या दोघांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाली.
बिपीन रावत यांचं कालचं वेळापत्रक कसं होतं?
DSSC वेलिंग्टनच्या 8 आणि 9 डिसेंबर रोजीच्या वेळापत्रकानुसार, CDS रावत हे 12:35 वाजता पाइन्सला पोहचणार होते. यानंतर दुपारी 12:35 ते 3:30 या वेळेत दुपारचे जेवण व इतर कार्यक्रम होणार होते. त्यानंतर दुपारी 3:30 ते 4:45 या वेळेत ते प्रकल्प स्थळाची पाहणी करणार होते. यानंतर संध्याकाळी 4.45 ते 5:15 या वेळेत ब्रीफिंग होणार होती.
मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर 5:30 ते 6:45 पर्यंत ते येथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार होते. त्याचवेळी संध्याकाळी 6:45 ते 7:55 या वेळेत इतर कार्यक्रमांना हजेरी लावायची होती. संध्याकाळ 8 वाजता सोशल इव्हिनिंगची वेळ निश्चित करण्यात आली होती. यानंतर रात्री 9 वाजता त्यांना पाइन्स येथून निघायचे होते. 9:05 वाजता WGC हेलिपॅडवर पोहोचून तेथून 9:15 वाजता उड्डाण करण्याचे ठरले होते.
यापूर्वीही हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत थोडक्यात बचावले होते!
सहा वर्षांपूर्वी जनरल रावत हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. 3 फेब्रुवारी 2015 रोजी नागालँडमधील दिमापूर येथे क्रॅश झालेल्या चिता हेलिकॉप्टरमध्ये रावत होते. त्यावेळी ते लेफ्टनंट जनरल होते.