गडचिरोली : पोलीस मुख्यालयात कार्यरत कर्मचारी महिलेचं टोकाचं पाऊल, वादानंतर घेतलं विष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (29 जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. प्रणाली काटकर (वय 35) असं आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे.

प्रणाली काटकर या गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होत्या आणि पोलीस वसाहतीत निवासात पतीसोबत राहायच्या.

Crime: सासरवाडीत येऊन जावयाने केली सासूची हत्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रणाली काटकर या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोनवाही येथील रहिवासी होत्या. मागील सात-आठ वर्षांपासून त्या गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.

दोन वर्षापूर्वी झालं होतं लग्न

ADVERTISEMENT

प्रणाली काटकर यांचा दोन वर्षांपूर्वी पोलीस विभागातच पोलीस शिपाई असलेल्या संदीप पराते यांच्यासोबत विवाह झाला होता. संदीप पराते यांचं हे दुसरं लग्न होतं. दोघेही पोलीस मुख्यालयानजिक असलेल्या पोलीस कर्मचारी वसाहतीतील एका इमारतीत राहत होते.

ADVERTISEMENT

कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग

प्रणाली काटकर आणि संदीप पराते यांच्यामध्ये वारंवार भांडणं व्हायची. शनिवारी (29 जानेवारी) रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रणाली काटकर यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर पती संदीप पराते यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर पेणमध्ये सामुहीक बलात्कार, सात जण अटकेत

दरम्यान, रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी प्रणाली काटकर यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT