Gadchiroli Encounter : "मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानं नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का"

Eknath Shinde on Gadchiroli Encounter : गडचिरोलीत सी-६० आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार... जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह ४ मोस्ट वाँटेड नक्षल्यांना कंठस्ना...
Gadchiroli Encounter : "मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानं नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का"
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे.India today/twitter

गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांनी नक्षलवादी संघटनेवर शनिवारी जोरदार प्रहार केला. जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेसह मोस्ट वाँटेड नक्षल्यांचा खात्मा केला. या कारवाईबद्दल गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. या कारवाईबद्दल एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 'शनिवारी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले आहेत. गडचिरोली पोलीस आणि सी ६० जवानांचे पथक यांनी ही कारवाई केली. गेल्या वर्षभरातील ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे.'

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे.
Milind Teltumbde : जहाल नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 4 प्रमुख नक्षली नेत्यांचा खात्मा

'गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून मी पोलिसांचं अभिनंदन केलं. जवानांचं पथक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी जिवाची बाजी लावून प्रत्युत्तर दिलं. जवळपास नऊ ते दहा तास ही चकमक चालली. यात २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चार जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही.'

'या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांवर मोठ्या रकमेची बक्षीसं होती. पोलीस आणि नागरिकांवरील अनेक हल्ल्यांत आणि हत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. ही महत्त्वाची कारवाई आहे. याची दखल इतर नक्षलग्रस्त राज्यांनीही घेतली आहे.'

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे.
Gadchiroli Encounter : 26 नक्षलवाद्यांची नावं आली समोर; अनेकांवर लाखो रुपयांचा इनाम

'जहाल नक्षलवादी आणि राज्यातील नक्षली संघटनेचा कमांडर मिलिंद तेलतुंबडे यालाही पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीबरोबरच शेजारील राज्यांचीही सूत्रं त्यांच्याकडे होती. तो नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्यही होता. त्याला त्रिस्तरीय सुरक्षा होती. कडक सुरक्षा असतानाही पोलिसांनी त्याला ठार केलं आहे.'

'मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील इतर राज्यातील नक्षलवाद्यांसाठीही मोठा धक्का आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश ही नक्षल प्रभावित राज्यही तेलतुंबडेच्या शोधात होती. तेलतुंबडे म्होरक्या होता. त्यांच्यावर 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्यामुळे गडचिरोली पोलीस सी६० कमांडो आणि मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे.'

'पोलीस नागरिकांची काळजी घेतात. पूर्वी जशी परिस्थिती होती, ती आता पूर्णपणे बदलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे राज्य सरकारचं लक्ष्य आहे. चांगला शाळा उभारल्या जात आहेत. आरोग्य सुविधेच्या योजना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी स्वतः जाऊन जखमी जवानांची भेट घेणार आहे', अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का

'गेल्या वर्षभरातील नक्षलविरोधी मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. वर्षभराच्या काळातील ही देशातील मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला हा सेटबॅक आहे, असं पालकमंत्री शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in