Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या

नंतर स्वतः विष पिऊन आत्महत्येचा केला प्रयत्न, पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या

जुगारी बापाने पत्नीसोबत झालेल्या भांडणातून आपल्याच सात वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी बापाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी बापाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाण्याच्या मुंब्रा भागात ही घटना घडली असून अनिस असं आरोपी बापाचं नाव आहे. अनिस आपली पत्नी सोफीया आणि सात वर्षांची मुलगी मायरासोबत मुंब्रा भागात रहायचा. अनिस हा बेरोजगार होता याशिवाय त्याला जुगाराचं व्यसन होतं. यावरुन पती आणि पत्नीविरुद्ध सारखे वाद व्हायचे. सोफीया स्वतः नोकरी करुन घर चालवत होती. परंतू पतीच्या जुगाराच्या व्यसनाला कंटाळून तिने मुलीसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या
भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्...; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला 'पाहा, हिचं काय केलं'

परंतू बायकोचा हा निर्णय अनिसला मान्य नव्हता. या मुद्द्यावरुन दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. अनिस वारंवार आपल्या पत्नीकडे जुगारासाठी पैसे मागायचा. यावरुन काही दिवसांपूर्वी अनिसचं पत्नीशी जोरदार भांडण झालं. यानंतर पत्नीने त्याला मुलीसोबत मी वेगळी राहते ही धमकी दिली. यानंतर संतापलेल्या अनिसने आपल्या सात वर्षीय मुलीला घेऊन मुंब्रा बायपास भागात जात तिची गळा दाबून हत्या केली.

Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या
लातूर: आई म्हणावं की कसाई.. 2 वर्षाच्या मुलाला आईनेच फेकलं विहिरीत; चिमुकल्याने हकनाक गमावला जीव

यानंतर अनिसने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंब्रा पोलिसांना याविषयी माहिती कळताच त्यांची घटनास्थळी धाव घेत अनिसला जे.जे. रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी अनिसविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.