Ganesh Utsav 2021 : 'या' दिग्गज राजकारण्यांच्या घरी बाप्पाचं आगमन!

अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज राजकारण्यांच्या घरी आले गणराय
Ganesh Utsav 2021 : 'या' दिग्गज राजकारण्यांच्या घरी बाप्पाचं आगमन!

गणपतीचा उत्सव सगळ्या महाराष्ट्रात साजरा होतो आहे. आज घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. राजकारणीही याला अपवाद नाहीत. विविध दिग्गज राजकारण्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक मंत्र्यांच्या घरी, दिग्गज राजकारण्यांकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. आज दिलीप वळसे पाटील यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे. ट्विटरवरही या संदर्भातला व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.

दिलीप वळसे पाटील गणपती बाप्पाची पूजा करताना

फोटो सौजन्य
फोटो सौजन्य ट्विटर, दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाची त्यांनी सहकुटुंब आरती केली. संगमनेर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाची आरती केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बाप्पाची पूजा करताना

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात गणपती बाप्पाची पूजा करताना

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेशाचं आगमन झालं आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आज त्यांनी सहकुटुंब गणेश उत्सव साजरा केला. अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगाव या ठिकाणी छगन भुजबळ आणि कुटुंबीय यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

छगन भुजबळ यांनी सार्वजनिक गणेश मंडळात येऊन सहकुटुंब दर्शन घेतलं

छगन भुजबळ
छगन भुजबळफोटो-ट्विटर

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशोक चव्हाण यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यांनी गणेशाची विधीवत पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. अशोक चव्हाण यांनी भाऊराव सहकारी साखर कारखान्यात गणरायाचं पूजन केलं.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गणेश पूजन करताना

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर नाना पटोले यांनीही सहकुटुंब बाप्पाची आरती केली आणि पूजा केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in