Advance Payment मागितलं म्हणून बड्या काँग्रेस नेत्याची गॅस डीलरला मारहाण?

काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांच्याविरुद्ध विष्णूनगर पोलिसांत तक्रार दाखल
Advance Payment मागितलं म्हणून बड्या काँग्रेस नेत्याची गॅस डीलरला मारहाण?
आमदार संजय दत्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

Advance Payment मागितलं म्हणून काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांनी चार तास कोंडून ठेवत मारहाण केल्याचा आरोप डोंबिवलीत एका गॅस डिलरने केला आहे. डोंबिवली पश्चिम परिसरात ही घटना घडली असून गॅस डिलर राजू यादवने संजय दत्त यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

संजय दत्त यांनी आपल्याला स्वतः मारहाण केल्याचा आरोप या कर्मचाऱ्याने केला असून कार्यालयातील सीसीटीव्ही तपासून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यादव यांनी केली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात झाली आहे. याबाबत संजय दत्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

डोंबिवली पश्चिम येथील अंबिका नगर येथे माजी आमदार आणि काँग्रेस नेते संजय दत्त यांची गॅस एजन्सी आहे. राजू यादव या गॅस एजन्सीमध्ये गेल्या २० वर्षांपासून काम करत आहे. ३० सप्टेंबरला सकाळी १० वाजता यादव आपलं थकलेलं Payment मागण्यासाठी संजय दत्त यांना भेटायला गेला. यावेळी संजय दत्त यांच्याशी वादानंतर दत्त यांनी आपल्याला कोंडून ठेवत मारहाण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप यादव यांनी केला. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in