Adani: अदानींना कोट्यवधींचा फटका देणारा Hindenburg Report आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Hindenburg Report and Adani: मुंबई: केंद्र सरकार (Central Government) लवकरच देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. अशावेळी गुंतवणूकदारांचे शेअर बाजारकडे (Share Market) डोळे लागून राहिलेले होते. पण अदानी ग्रुपसंबंधात (Adani Group) आलेल्या एका रिपोर्टने त्यांच्या भ्रमनिरास केला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) जे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते ते आता सातव्या स्थानावर घसरले आहेत. तर शेअर्स 20 टक्क्यांनी गडगडले आहेत. त्यामुळे हजारो कोटींचं नुकसान झालं आहे, हे सगळं व्हायला कारणीभूत ठरलाय Hindenburg research चा एक रिपोर्ट. असं काय आहे या रिपोर्टमध्ये ज्यामुळे अदानींना कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. (gautam adanis loss of crores of rupees what is hindenburg actual report)

Hindenburg Research ने 2 वर्ष इन्व्हेस्टिगेशन करून हा रिपोर्ट समोर आणला आहे. हजारो कागदपत्रांची छाननी आणि अनेक देशांमध्ये दौरा केल्यानंतर Hindenburg research ने हा अहवाल तयार केला आहे. अदानींना जबरदस्त झटका देणाऱ्या या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, ते पाहूयात.

अदानींच्या गेल्या 3 वर्षात त्यांच्या संपत्तीत 100 अब्ज डॉलरचा नफा दिसलाय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे, अदानी ग्रूपच्या 7 कंपन्यांचे वधारलेले शेअर्स.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

*रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

1. जगातला तिसरा श्रीमंत व्यक्ती जगातली सर्वात मोठी चोरी करत आहेत. अकाऊंटिंग फ्रॉडचे आरोप

2. गेल्या 3 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत कमालीची वाढ

ADVERTISEMENT

3. गेल्या 3 वर्षात गौतम अदानींना तब्बल 100 अब्ज डॉलरचा नफा झाला

ADVERTISEMENT

4. 7 लिस्टेड कंपन्यांचे भाव तब्बल 819 टक्क्यांनी वाढले आहेत.

Hindenburg Report ने खळबळ : अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण कायम!

*कोणत्या आहेत या कंपन्या?

1. अदानी पोर्ट्स

2. अदानी टोटल गॅस

3. अदानी एंटरप्रायझेस

4. अदानी ट्रांसमिशन

5. अदानी पॉवर

6. अदानी विल्मर

7. अदानी ग्रीन एनर्जी

रिपोर्टमध्ये असंही सांगितलंय की अदानी ग्रुपविरोधात तब्बल 17 अरब डॉलरच्या सरकारी फसवणुकीचा तपास झाला आहे, ज्यात मनी लाँड्रिंग, करचोरी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत.

अदानी ग्रुपवर प्रचंड कर्ज आहे आणि अनेक शेअर्स त्यांनी गहाण ठेवले आहेत. पहिले अदानींचे शेअर्स 2 ते 3 वर्षात 3 हजार टक्क्यांनी वाढले आणि नंतर जेव्हा हेच शेअर्स गगनाला भिडले तेव्हा त्याच शेअर्सवर अदानी ग्रुपने कर्ज घेतली.

अदानींच्या कंपनीतील वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये 22 पैकी 8 जण तर अदानी कुटुंबातलेच आहेत. ग्रुपच्या आर्थिक आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यामुळे अदानी कुटुंबीयांचाच कंट्रोल असतो.

Dharavi प्रोजेक्ट अडकणार?, अदानी समूहाविरोधात प्रकरण कोर्टात

*कोण आहेत हे सदस्य?

1. अदानी ग्रूपचे मॅनेजिंग डिरेक्टर राजेश अदानी हे गौतम अदानींचे भाऊ आहेत. ज्यांना फॉर्जरी आणि टॅक्स चोरीप्रकरणी दोनवेळा अटक झालेली.

2. समीर वोहरा, गौतम अदानींचे मेहुणे डायमंड ट्रेडिंग स्कॅममध्ये आरोपी होते. 1994 पासून अदानी ग्रूपसोबत असून ते रेल प्रोजेक्ट, पोर्ट प्रोजेक्ट पाहतात.

3. विनोद अदानींवर Hindenburg चा आरोप आहे की, गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी शेअरच्या किंमती वाढवण्याचं काम करतात. ते मॉरिशिअसचे फंड्स आणि शेल कंपन्यांमार्फत अदानींच्या शेअर्समध्ये पैसे लावत आहेत.

विनोद अदानींमार्फत चालवल्या जाणाऱ्या 38 शेल कंपन्यांचा उल्लेखही रिपोर्टमध्ये आहे. या कंपन्या सायप्रस, UAE, सिंगापूरसारख्या ठिकाणी आहेत. रिपोर्टमध्ये सांगितलंय की, या कंपन्यांच्या कामाचा कुठेच काही रेकॉर्ड नाहीये, ना पत्ता ना कोणते कर्मचारी. असं असूनही बिलियन डॉलर्स अदानींच्या पब्लिकली लिस्टेड आणि प्रायव्हेट एंटिटीजमध्ये जमा करण्यात आले आहेत.

अदानी ग्रुपने टॅक्टहेवन मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये शेल कंपन्या उभारल्यात आणि याच शेल कंपन्यांचं एक मोठं साम्राज्य तयार करून शेअर्सचे दर वधारले.

या रिपोर्टमुळे एका दिवसात अदानीच्या सातही कंपन्यांचे शेअर्स एकूण 55 हजार कोटींनी गडगडले.

अदानी ग्रुपने काय दिलंय स्पष्टीकरण?

Hindenburg चा रिपोर्ट दिशाभूल करणारा असून त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. अदानी ग्रुपची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणत्याही संशोधनाशिवाय हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. रिपोर्टमुळे कंपनीच्या शेअर्स आणि गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.

शेअर बाजारातील घसरणीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अदानी एंटरप्रायझेस च्या FPO ला नुकसान पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा दावा अदानी ग्रुपकडून करण्यात आला आहे.

काय आहे Hindenburg?

Hindenburg अमेरिकेची फॉरेन्सिक फायनाशिअल रिसर्च एजन्सी आहे. ही फर्म इन्वहेस्टमेंट मॅनेज करण्याचं काम करते. equity, credit आणि derivatives चं अनालिसिस करते.

1937 साली Hindenburg डिसास्टरच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. ही फर्म अकाऊन्टिंगमध्ये येणाऱ्या irreguilarities ला ट्रॅक करते. मॅनेजमेंटध्ये जे काही खराब एलिमेंट्स येतात ते समोर आणते. unethical practices पण उघड करते. न्यू-यॉर्क येथे त्यांचं मुख्य कार्यालय आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT