अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने ‘असा’ काढला काटा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झालावाड (राजस्थान): राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे वर्षभरापासून दुसऱ्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध सुरु होते. त्यामुळे आपल्या याच प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्या पतीची हत्या (Murder) केली. यानंतर मृतदेह कारमध्ये भरून तिने शहराबाहेर फेकून दिला. यावेळी वापरण्यात आलेली कारही तिथेच सोडून दिली होती. पोलिसांनी तात्काळा या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतरच संपूर्ण घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार हा अकलेरा माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक होता. 28 जानेवारी 2022 रोजी बरडावदा मुकेशचा मृतदेह सापडला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाच तपास सुरु केला. यावेळी मुकेशच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या आणि मुकेशची कारही जवळच सापडली होती.

गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुकेशच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. या तपासादरम्यान कविता मीना यांनी यापूर्वीही मुकेशला मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. ज्या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एसपी मोनिका सेन यांनी सांगितले की, 28 जानेवारी 2022 रोजी पोलिसांना बरडावदा जवळ एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. मृत व्यक्ती मुकेश कुमार असून तो एका माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली ज्यामध्ये पत्नी कविता हिनेच मुकेशची हत्या केल्याचं समोर आलं.

कविता आणि तिच्या प्रियकराला अटक

ADVERTISEMENT

कविताने आधी पती मुकेश याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. नंतर तिने प्रियकरासह मुकेशचा गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह प्रियकरासह बरडावदा येथे नेऊन फेकून दिला. मृत मुकेश मीणा याच्या मानेवर पोलिसांना जखमेच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ज्यामध्ये पोलिसांना मुकेश मीनाची पत्नी कविता आणि तिच्या प्रियकर असल्याचे पुरावे सापडले. त्यामुळेच पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.

ADVERTISEMENT

एसपी मोनिका सेन यांनी सांगितले की, मृत मुकेशची पत्नी कविता मीणा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं होतं की, 2006 साली तिचा मुकेश मीणा याच्याशी विवाह झाला होता. 2019 मध्ये काही कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. याचाच राग येऊन पती मुकेश कुमार याने शिवानी नावाच्या मुलीशी दुसरे लग्न केले होते. पण चार महिन्यांनी पहिली पत्नी कविता ही पुन्हा आपल्या सासरी आली. त्याच दिवशी शिवानी ही आपल्या माहेरी निघून गेली.

कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग

महिलेचा प्रियकर तेजराजने सांगितली संपूर्ण हकीकत

आरोपी तेजराजने पोलिसांना सांगितले की, त्याचे कविता मीणासोबत एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. कविताशी बहुतेक वेळा तो व्हॉट्सअॅप कॉलवरुनच बोलायचा. तो जेव्हा कधी कविताला भेटायला जायचा तेव्हा कविता आपली पती मुकेशला झोपेच्या गोळ्या देत असे. तसेच कविता तिच्या घरी लावलेले सीसीटीव्ही देखील बंद करुन टाकायची.

दरम्यान, मुकेशला या सगळ्या प्रकाराबाबत जेव्हा समजलं तेव्हा तो प्रचंड चिडला. त्यामुळे मुकेशला कायमचा संपविण्याचा कट रचण्यात आला. आरोपी तेजराजने सांगितले की, कविताने एके दिवशी मुकेशला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर कविताने त्याचे हात धरुन ठेवले आणि मी त्याची गळा दाबून हत्या केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT