
कोलकात्यात एका समलिंगी जोडप्याने लगीनगाठ (Gay Couple marriage) बांधली. एका पुरूषाने दुसऱ्या पुरूषाशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचे तसंच हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नात या दोघांचेही मित्र-मैत्रणी तसंच कुटुंबीयही उपस्थित होते. अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा या दोन पुरूषांचा विवाह सोहळा कोलकात्यात पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तसंच या दोन पुरूषांच्या विवाहाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.
चैतन्यने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तसंच लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. सोशल मीडियावर लोक या जोडप्याचं अभिनंदन करताना दिसत आहेत. तसंच या लग्नाची चर्चाही रंगली आहे. दोघांनाही लग्न केल्याचा खूप आनंद झाला आहे. फोटोंमध्ये तो आनंद या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो आहे.
दोन पुरूषांचा खास सोहळ्यात विवाह झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिषेक रे हे कोलकाता येथील डिझायनर आहेत. अभिषेकने त्याचा खास मित्र चैतन्य शर्मा सोबत लग्न केले. कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले. लग्नात संगीत सोहळ्यापासून हळद, मेहंदीपर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले. दोन्ही कुटुंब एकत्र होते आणि त्यांनी आनंदाने जोडप्याला आशीर्वाद दिला. गे कपलच्या हळदी आणि लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
शास्त्रानुसार मंत्रोच्चार करून त्यांचं लग्न झालं. कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले.अभिषेकने पारंपारिक बंगाली वर म्हणून धोती आणि कुर्ता घातला होता, तर चैतन्यने शेरवानी घातली होती.
भारतात पहिला समलिंगी विवाह २०१७ मध्ये झाला होता. ३० डिसेंबर २०१७ ला विवाह पार पडला होता. त्यानंतर आता चैतन्य शर्मा आणि अभिषेक रे या दोघांनी लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि त्यांच्या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.