CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन

'रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार, पार्थिवं संध्याकाळी दिल्लीत आणली जाणार'
CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची  चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन

भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर सर्व देशावर शोककळा पसरली आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातीन सदस्यांनीही रावत यांच्या अपघाती निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल निवेदन सादर करत या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं.

तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेले जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असंही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना जाहीर केलं.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची  चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन
CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

"रावत यांचं हेलिकॉप्टर दुपारी सव्वा बारा वाजता सुलुर एअरबेसवर लँड होणं अपेक्षित होतं. परंतू १२ वाजून ८ मिनीटांच्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. यानंतर स्थानिकांना त्या जागेवर हेलिकॉप्टर कोसळलेलं पहायला मिळालं. स्थानिक यंत्रणेने या अपघातातील जखमींना लवकरात लवकर बाहेर काढून वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतू यात CDS बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला", असं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं.

या अपघातात ज्यांचा जीव वाचला ते ग्रूप कॅप्टन वरुण सिंग हे ४५ टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते लवकरात लवकर बरे होवोत अशी आमची प्रार्थना असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांची पार्थिव एअरफोर्सच्या विमानाने गुरुवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीत आणली जातील, ज्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातीस.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची  चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन
History of Air Crashes in India: CDS बिपीन रावतच नव्हे तर 'या' राजकीय नेत्यांनाही विमान अपघातामुळे आपण गमावलंय!

एअर चिफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून त्यांच्यासोबत तामिळनाडूतील फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटचं एक पथक या अपघाताचा तपास करत आहे. एअर मार्शल मनविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या अपघाताची त्रिसदस्यीय चौकशी नेमण्यात आलेली असल्याचं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केलं.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची  चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन
हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावतांचा मृत्यू, घटनास्थळावरील Exclusive फोटो

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर महत्वाची गोष्ट म्हणजेच ब्लॅक बॉक्स तपासयंत्रणांच्या हाती लागलेला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणापासून ३०० मी. ते १ किलोमिटरपर्यंतचा परिसर कसून तपासला जात आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळू शकणार आहे.

CDS Bipin Rawat Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेची  चौकशी होणार - राजनाथ सिंहांचं लोकसभेत निवेदन
Bipin Rawat यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता सर्जिकल स्ट्राईक, जाणून घ्या बिपिन रावत यांच्याबद्दल..

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in