Tata Steel चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 60 वर्षापर्यंत मिळणार संपूर्ण पगार! - Mumbai Tak - generousness of tata steel on the death of the employee from corona the family will get full salary for 60 years - MumbaiTAK
बातम्या

Tata Steel चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 60 वर्षापर्यंत मिळणार संपूर्ण पगार!

मुंबई: कोरोनामुळे देशात कोट्यवधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे जीव गमवाल्याने अनेक कुटुंबं ही उघड्यावर आली आहेत. अनेकांची मुलं निराधार झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक कॉर्पोरेट कंपन्या या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान टाटा स्टीलने मोठी घोषणा केली आहे. […]

मुंबई: कोरोनामुळे देशात कोट्यवधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे जीव गमवाल्याने अनेक कुटुंबं ही उघड्यावर आली आहेत. अनेकांची मुलं निराधार झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक कॉर्पोरेट कंपन्या या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान टाटा स्टीलने मोठी घोषणा केली आहे.

टाटा स्टीलने घोषित केले आहे की, कोरोनामुळे त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास त्या मृत कर्मचाऱ्याची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत (म्हणजे निवृत्तीचे वय होईपर्यंत) त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण वेतन देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनी त्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचीही पूर्ण व्यवस्था करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय आणि राहण्याची सुविधादेखील मिळेल.

मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार!

टाटा स्टील व्यवस्थापनाने म्हटले आहे की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा अंतर्गत मदत करण्यासाठी प्रत्येक संभाव्य पुढाकार घेत आहे. जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍याचे भविष्य चांगले राहील. टाटा मॅनेजमेंटने असे म्हटले आहे की, कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील त्यांच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या व्यक्तीच्या निवृत्तीपर्यंत (60 वर्ष पूर्ण होईपर्यंत) वेतन देईल. याव्यतिरिक्त, फ्रंटलाइन वर्कर जर ड्यूटीवर असताना त्याचा मृत्यू झाला तर अशा कामगारांच्या मुलांचे भारतातील पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च टाटा स्टील कपंनी करेल.

‘या’ देशाचे आभार मानावे तेवढे थोडेच, भारताच्या कठीण काळात अत्यंत मोलाची मदत

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना चांगले पैसे आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळतात. परंतु खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना विशेष काही मिळत नाही. परंतु कोरोना संकटाच्या युगात खासकरुन खासगी कंपन्यांनी या दिशेने औदार्य दाखवून चांगले पाऊल उचलले आहे.

रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

कंपनी नेमकं काय म्हटलं आहे?

टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी विचार करीत असते. कोव्हिडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याआधीही टाटा यांनी कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि मानक निश्चित केले आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =

Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा!