FB, What's App नंतर आता Gmail झालं डाऊन, मेल पाठवण्यात येत आहेत अडचणी

ग्राहाकांना मेल मिळण्यात आणि पाठवण्यात येत आहेत अडचणी
FB, What's App नंतर आता Gmail झालं डाऊन, मेल पाठवण्यात येत आहेत अडचणी

मागच्याच आठवड्यात फेसबुक आणि What's App डाऊन झालं होतं. आता Gmail डाऊन झालं आहे. संपूर्ण भारतातल्या नेटकऱ्यांना जीमेलवरून मेल पाठवत असताना अडचणी येत आहेत. कुणाला मेल पाठवताना अडचणी येत आहेत तर कुणाला मेल मिळण्यात अडचणी येत आहे

इंटरनेट सर्व्हिस आऊटेज वर नजर ठेवणाऱ्या Down Detector च्या माहितीनुसार 68 टक्के लोकांनी हे रिपोर्ट केलं आहे की त्यांना जीमेल वापरण्यात अडचणी बासत आहेत. 18 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनबाबतही रिपोर्ट केला आहे. तर 14 टक्के लोकांनी लॉग इन करताना त्यांना समस्या जाणवते आहे असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर काही लोकांनी इंस्टाग्रामवर #Gmaildown ही ट्रेंड केला आहे. कंपनीने जीमेल का डाऊन झालं आहे त्याचं कारण सांगितलेलं नाही. अशात काही वेळापूर्वी जीमेल डाऊन झालं आहे. गेल्याच आठवड्यात दोनवेळा सोशल मीडिया साईट फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही डाऊन झाले होते. सुमारे सहा तास फेसबुक, whats app डाऊन झालं होतं. या दोन्ही कंपन्यांनी एक प्रेस रिलिज काढून दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच आम्ही लवकरात लवकर या सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असंही या दोन्ही कंपन्यांनी म्हटलं होतं. आता जीमेलतर्फे असं काही स्पष्टीकरण देण्यात येतं आहे का याची नेटकरी वाट बघत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in