Goa Assembly Election: 'कोणालाही न फोडता सत्ता स्थापन केली, गोव्यात सेना 22 जागा लढवेल'

Shiv Sena fill fight for 22 seats in Goa Assembly election: शिवसेना गोव्यात 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.
Goa Assembly Election: 'कोणालाही न फोडता सत्ता स्थापन केली, गोव्यात सेना 22 जागा लढवेल'
Shiv Sena fill fight for 22 seats in Goa Assembly election said by Sanjay Raut

मुंबई: 'गोव्यासारखं आम्ही कोणताही पक्ष फोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली नाही. तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्ही सत्ता स्थापन केली. त्यामुळेच आता गोव्यात शिवसेनेने 22 जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.' अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. गोव्याला जाण्याआधी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

'भाजप आज राज्यात सत्ता आणण्यासाठी कोणाला तरी फोडण्याचा प्रयत्न करतंय किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय. ईडी किंवा सीबीआयच्या माध्यमातून लोकं फुटतायेत का त्याचा प्रयत्न सुरु आहे.' असे आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

गोवा विधानसभेसाठी शिवसेनेने देखील आतापासूनच तयारी सुरु केली आहे. गोव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने तूर्तास तरी एकट्याने 22 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला गोव्यात आतापर्यंत आपला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. मात्र, असं असलं तरीही शिवसेनेने येथे आपलं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

'गोव्यातील सरकार रोज एक नवी थाप मारते'

'बाळासाहेब हे सुद्धा गोव्यात प्रचाराला जात होते. ठीक आहे आम्हाला यश नसेल मिळालं पण तिथे आमचं संघटन आहे. आता मी निघालोय. उद्धवजींनी मला गोव्याला जाण्यास सांगितलं आहे. आम्ही साधारण 22 जागा लढू गोव्यात. गोव्यातील सरकार रोज एक नवीन थाप मारते. गोवा हे सगळ्यात मोठं पर्यटन केंद्र आहे देशाचं. पण आज तिकडे संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थाचा विळखा पडलेला आहे.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले

'भाजपचा कॅसिनोला आधी विरोध आता पाठिंबा'

'गोव्यातील कॅसिनोला विरोध करुन भाजप सत्तेत आला वाढला. पण आज त्यांचाच कॅसिनोला पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. दोन-तीन दिवस आम्ही गोव्यात असणार आहोत. नक्कीच आम्ही लोकांपर्यंत पोहचू.' असं म्हणत राऊतांनी भाजपविरुद्ध गोव्यात रणशिंग फुकलं आहे.

'महाराष्ट्रात आम्ही फोडाफोड केली नाही'

'महाराष्ट्रात आम्ही फोडाफोड केली नाही. आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्रात एका कोणता पक्ष फोडला नाही. हे लक्षात घ्या. आम्ही सामान किमान कार्यक्रम ठरवून एकत्र आलेलो आहोत. जसं आज भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करतंय. कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय.'

'ईडी असेल सीबीआय असेल त्या माध्यमातून लोकं फुटतायेत का याचा विचार सुरु आहे. पण तसं आम्ही कुठे केलेलं नाही. हे तीन पक्ष आले कारण राज्याची गरज आणि स्थिरता. म्हणूनच तर सरकार स्थापन झालं.'

'त्यामुळे गोव्याची तुलना महाराष्ट्राशी होऊच शकत नाही. गोव्यात मात्र पक्ष फोडून सरकार स्थापन केले जात आहे. या सगळ्याला गोव्याची जनता देखील वैतागलेली आहे. कारण गोव्यात जनता एक आमदाराला निवडून देते आणि तो आमदार लगेच दुसऱ्या पक्षात जातो.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Shiv Sena fill fight for 22 seats in Goa Assembly election said by Sanjay Raut
'गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा', 'सामना'तून भाजपवर घणाघाती टीका

'खरं तर तेव्हाच काँग्रेसने सरकार बनवलं पाहिजे होतं'

'काँग्रेस गोव्यात 17 जागा जिंकली होती. ते बहुमताच्या अगदी जवळ होते. त्यामुळे त्यांनी सरकार बनवलं पाहिजे होतं. पण काय झालं ते तुम्ही पाहिलं. वेगवेगळे पक्ष फोडून भाजप सत्तेत आली. 17 आमदारांचा पक्ष आता फक्त चार जणांची राहिली आहे. पण आता गोव्याच्या जनतेने येथील आमदारांना धडा शिकवला पाहिजे. गोव्यात काँग्रेससोबत युती होईल किंवा नाही हा प्रश्न वेगळा पण आम्ही 22 जागा जिंकण्याची तयारी केली आहे.' अशी माहिती राऊतांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.