Ganesh Utsav 2021 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पाच कोटींचा सोन्याचा मुकुट भेट

दगडूशेठ गणपतीला भेट करण्यात आलेल्या सोन्याच्या मुकुटाचं वजन 10 किलो इतकं आहे
Ganesh Utsav 2021 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पाच कोटींचा सोन्याचा मुकुट भेट

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेश उत्सवादरम्यान एका भक्ताने 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की पुणे शहरातील एका उद्योगपतीने हा मुकुट भेट दिलं आहे. या मुकुटावर सुंदर कारगिरी करण्यात आली आहे.

या मुकुटावर शंकर आणि पार्वती यांचं चित्र कोरलेलं आहे. आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर या भक्ताने हा मुकुट दान केला आहे. आपलं नाव समजू नये अशी दान करणाऱ्या व्यक्तीची इच्छा आहे. त्यामुळे हे नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.

हा सोन्याचा मुकुट आहे, याची बाजारील किंमत साधारण पाच कोटींच्या घरात आहे. यामध्ये जे सोनं वापरण्यात आलं आहे त्याचीच किंमत 4 कोटी 80 लाख आहे. यावरची कारागिरी सुंदर आहे असंही दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या विश्वस्ताने सांगितलं आहे.

1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. पुण्यातलं प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची ख्याती आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in