रशिया युक्रेन युद्धानंतर जळगावात वाढला सोन्याचा भाव, प्रति तोळा 51 हजारांच्याही पुढे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युक्रेन रशिया युद्ध सुरू होताच सोन्याच्या भावात उसळी पहायला मिळाली. सकाळी सराफा बाजार उघडला आणि काही वेळातच युद्धालाही सुरवात झाल्याने सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 51 हजार 800 रुपयांवर पोहचला आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजार तसेच मुंबई शेअर बाजार खाली आला आहे तर भारतीय रुपयाही 50 पैश्यांची स्वस्त झाला आणि सोन्याचे भाव वाढत उच्चांकी गाठली आहे.

सोन्याचे 55 हजार पर्यंत पोहोचतील – जाणकारांच मत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

युद्ध असेच सुरू राहील तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति तोळा भाव 55 हजारांपर्यंत जाईल असा आंदाज व्यक्त जळगाव सराफ असोशियशनचे सचिव तसेच सोने भावाचे जाणकार स्वरूपकुमार लुंकड यांनी व्यक्त केला आहे.मात्र युद्ध संपताच हा भाव त्याच वेगाने खालीही येतील असंही मत व्यक्त केल आहे.यामुळे सोन्याची खरेदी किंवा इन्व्हेंस्ट करतांना ग्राहकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही लुंकड यांनी दिला आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे. याचा परिणाम आता भारतातल्या शेअर बाजारावर झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शेअर मार्केटमध्ये घसरण

रशियाच्या हल्ल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजार 1458 अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही 387 अंकांची घसरण झाली आहे. तर ICICI बँकेचे शेअर्स उघडताच 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व सेक्टोरियल इंडेक्स घसरणीच्या लाल चिन्हात बुडलेले आहेत.

देशांतर्गत शेअर बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे.

शेअर मार्केटच्या प्री-ओपनिंग सेशनमध्येच आज बाजारात मोठी पडझड होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 1,800 अंकांपेक्षा जास्त म्हणजेच, 3.15 टक्क्यांनी घसरला होता. NSE निफ्टीतही 500 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1300 हून अधिक अंकांची घसरणीत झाली. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 55,750 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 350 हून अधिक अंकांनी घसरून 16,700 च्या खाली आला होता.

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत बाजारातील तेजी निवळल्याचं पाहायला मिळालं. दिवसभराचा व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स 68.62 अंकांनी (0.12 टक्के) घसरून 57,232.06 अंकांवर होता. NSE निफ्टी देखील 28.95 अंकांच्या (0.17 टक्के) घसरणीसह 17,063.25 वर होता. अशाप्रकारे सलग सहाव्या दिवशी मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT