Gold-Silver Price Today: सोनं-चांदी झालं स्वस्त , दरात मोठी घसरण! पाहा काय आहे आजचा सोन्याचा भाव

Gold-Silver Rate down today: सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोने आणि चांदीचे नेमके दर.
Gold-Silver Price Today: सोनं-चांदी झालं स्वस्त , दरात मोठी घसरण! पाहा काय आहे आजचा सोन्याचा भाव
gold silver rate down today 03 november 2021diwali gold silver prices ibjarates com gold silver latest updatesफाइल फोटो

मुंबई: Gold-Silver Price Today 03 November 2021 Diwali: भारतीय सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये Gold-Silver Price) आज मोठा बदल झाला आहे. काल धनत्रयोदशीच्या तुलनेत आज (बुधवार) म्हणजेच 03 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. सकाळी 999 शुद्ध सोन्याचा भाव हा (999 Purety Gold Price) 47512 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. जे मागील ट्रेडिंग दिवसाच्या संध्याकाळच्या दरापेक्षा 324 रुपये स्वस्त आहे.

995 शुद्धता म्हणजेच 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रति दहा ग्रॅमचा भाव 322 रुपयांनी कमी होऊन 47322 वर आला आहे. त्याच वेळी, जेव्हा चांदीचा विचार केल्यास तर त्याच्या किंमतीत देखील घट झाली आहे. कालच्या तुलनेत चांदी 1327 रुपयांनी स्वस्त झाली आहे. बुधवारी(03 November, Silver Price)एक किलो चांदीचा भाव 62,881 रुपये एवढा आहे.

Gold and Silver Rate Today:सोने आणि चांदीचा आजचा दर

सोनं प्रति 10 ग्राम (999 Purety)

 • मंगळवारचा दर - 47836

 • बुधवारचा दर - 47512

सोनं प्रति 10 ग्राम (995 Purety)

 • मंगळवारचा दर - 47644

 • बुधवारचा दर - 47322

सोनं प्रति 10 ग्राम (916 Purety)

 • मंगळवारचा दर - 43818

 • बुधवारचा दर - 47521

सोनं प्रति 10 ग्राम (750 Purety)

 • मंगळवारचा दर - 35877

 • बुधवारचा दर - 35634

सोनं प्रति 10 ग्राम (585 Purety)

 • मंगळवारचा दर - 27984

 • बुधवारचा दर - 27795

चांदी प्रति 1 किलो (999 Purety)

 • मंगळवारचा दर - 64208

 • बुधवारचा दर - 62881

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (Indian Bullion Jewelers Association) अधिकृत वेबसाइट ibjarates.com द्वारे, तुम्हाला वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्या-चांदीच्या किमती आणि त्यामधील बदलांची दररोज माहिती मिळते. ही किंमत टॅक्स आणि मेकिंग चार्जच्या आधीच्या असतात. मात्र, या किमतींमध्ये जीएसटीचा समावेश नाही. अशा परिस्थितीत जेव्हा या सोन्याच्या दरानुसार दागिने बनवले जातात, तेव्हा त्यांच्या किंमती थोड्या जास्त असू शकतात.

धनत्रयोदशीच्या तुलनेत आज किती स्वस्त झालं सोने-चांदी?

ibjarates.com वर सोने-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. पहिले दर हे दुपारी येतात, तर दुसरा दर हा संध्याकाळी येतो. यावेळी दोन्ही दरांवरुन हे समजतं की, सोने-चांदीच्या किमती किती बदलल्या आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी (3 नोव्हेंबर) सोने-चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.

आदल्या दिवशी 999 शुद्धतेचे सोने

47836 प्रति दहा ग्रॅमवर ​​दरावर बंद झाले होते. 995 शुद्धतेचे सोने हे 47644, 916 शुद्धतेचे सोने 43818, 750 शुद्धतेचे सोने 35877 आणि 585 शुद्धतेचे सोने 27984 रुपये होते. याशिवाय चांदीचा भाव 64208 रुपये प्रति किलो होता.

gold silver rate down today 03 november 2021diwali gold silver prices ibjarates com gold silver latest updates
Gold Investment: एका वर्षात सोने झालं 8000 हजारांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे?

फोनवर देखील जाणू न घेऊ शकता Gold-Silver Price

ibja केंद्र सरकारकडून घोषित केलेल्या सुट्ट्या, शनिवारी आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर करत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घ्यायचा असेल तर आपण 8955664433 वर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉल केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे सोन्या-चांदीच्या दरांची माहिती दिली जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in