'सरकार तुमचंच पण लुटू नका'; अजित पवारांचा मिश्किल टोला

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले अजित पवार आणि काय घडलं?
'सरकार तुमचंच पण लुटू नका'; अजित पवारांचा मिश्किल टोला

सरकार तुमचंच आहे, पण लुटू नका असा मिश्किल सल्ला आज अजित पवारांनी दिला. अजित पवार हे त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच शैलीचा अनुभव बारामतीतल्या माळेगावकरांनी घेतला. सरकार तुमचं आहे मात्र लुटू नका असं जेव्हा अजितदादा म्हणाले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नेमकं काय घडलं?

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस संकुल इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी एक गंमतीशीर किस्सा सांगितला. गेल्या महिनाभरात अजित पवार भरपूर येथे होत असलेल्या नवीन पोलीस मुख्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी येथील एका शेतकऱ्याने नियोजित पालखी मार्गालगत आंब्याची झाडे लावली होती. मात्र त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एकही झाड नव्हते त्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी आंब्याच्या झाडाची किंमत जास्त मिळते असं उत्तर दिलं. त्यावर मिश्कीलपणे टिपण्णी करत सरकार तुमचच आहे म्हणून लुटू नका. जेवढं नियमाने असेल तेवढेच घ्या शेवटी सरकार..सरकार म्हणजे तरी काय. नोटा छापत नाही शेवटी जनतेचा टॅक्स रूपाने येणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जातो.

''सरकार तुमचंच आहे म्हणून लुटू नका. जेवढं नियमाने असेल तेवढेच घ्या शेवटी सरकार.... सरकार म्हणजे तरी काय, नोटा छापत नाही. शेवटी जनतेचा टॅक्स रूपाने येणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जातो.''

अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

आणखी काय म्हणाले अजित पवार?

एसटीच्या संदर्भात अनेक मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगार वाढ दिलीआहे. विलनीकरणाबाबत समिती नेमली आहे. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि गोरगरिबांना एसटी लागते. अनेक राज्यांचा आढावा घेतला त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. पण आजही काही जणांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विलीनीकरण करा असेच सांगून चालत नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in