'2022 मध्ये सरकार बदलणार, भाजपसोबत कुणी यायचं यासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ'

चंद्रकांत पाटील यांच्या सूचक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळा विविध चर्चा सुरू
'2022 मध्ये सरकार बदलणार, भाजपसोबत कुणी यायचं यासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ'
महाविकास आघाडीफोटो-इंडिया टुडे

2022 मध्ये महाराष्ट्र सरकार बदलणार आहे. भाजपसोबत कुणी यायचं यासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. शरद पवारांनी जे वक्तव्य मोदींबाबत केलं त्यावरही चंद्रकांत पाटील म्हणाले की शरद पवार यांचा खरं बोलण्याचा इतिहास नाही. मोदींमध्ये शरद पवारांमध्ये काय बोलणं झालं मला माहित नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मागील दोन दिवसांपासून भाजप सोबत कोणता पक्ष महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून सरकार तयार करणार याच्याकरता चढाओढ सुरू आहे. असं सांगत नया साल नई उमंग म्हणत नव्या वर्षात सरकार बदलण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीने जे अधिवेशन आत्ता घेतलं त्यात जनतेचे कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी
अजितदादा महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही सगळ्यात फायद्यात-फडणवीस

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याआधी राज्यातील जनतेत या सरकारबद्दल काहीशी नाराजी होती. तीनही पक्ष फक्त आणि फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहेत अशी भावना लोकांमध्ये होती. लोकांमधील हीच भावना नाहीशी व्हावी आणि भाजप देखील सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ शकते हे दाखवून देण्यासाठी स्वत: शरद पवार यांनीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले असल्याचं चर्चा आजही आहे. त्याचबाबत शरद पवार यांनी आता सविस्तर खुलासा केला आहे.

महाविकास आघाडी
शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, खेळवत ठेवतात: नारायण राणे

शरद पवार यांचा काही दिवसांपूर्वी 81वा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने 'लोकसत्ता' वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात शरद पवार यांची विशेष मुलाखतही घेण्यात आली. त्यावेळी ते पहाटेच्या शपथविधीबाबत सविस्तरपणे बोलले. 'मी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं.' असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच मोदींनी त्यावेळी मला एकत्र येण्याबद्दल विचारलं होतं मात्र मी त्यांना नाही म्हटलं असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

याविषयी विचारलं असता शरद पवार आणि खरं बोलण्याचा इतिहास नाही असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच नव्या वर्षात सरकार बदलणार असंही भाकित त्यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in