Helicopter Crash: ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन, CDS बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात झालेले जखमी

Helicopter Crash: ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं उपचारादरम्यान बुधवार (15 डिसेंबर) निधन झालं आहे.
group captain varun singh died was injured in a helicopter accident along with cds bipin rawat
group captain varun singh died was injured in a helicopter accident along with cds bipin rawat(फाइल फोटो)

नवी दिल्ली: तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही बुधवारी (15 डिसेंबर) निधन झाले आहे. 8 डिसेंबर रोजी, CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला होता.

या अपघातातून वरुण सिंग हे एकमेव व्यक्ती होते की जे बचावले होते. अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेले सहा दिवस त्यांची मृत्यूशी जी झुंज सुरु होती ती अखेर अपयशी ठरली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे आता हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ही 14 झाली आहे.

IAFने ट्विट करून म्हटले आहे की, 'भारतीय हवाई दलाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघातात ते एकमेव व्यक्ती होते की जे बचावले होते. हवाई दल अधिकारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत.'

यूपीतील दवरियाचे रहिवासी होते वरुण सिंग

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील खोरमा कन्होली गावचे रहिवासी होते. त्यांच्यावर बंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. वरुण हे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचे बॅचमेट होते. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावले होते.

वरुण सिंगचे वडीलही होते लष्करात

कॅप्टन वरुण सिंग यांचा जन्म दिल्लीत झाला होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 42 वर्षे होते. त्यांचे वडील कृष्ण प्रताप सिंग हे लष्करात कर्नल म्हणून निवृत्त झाले होते. वरुणचा लहान भाऊ तनुज सिंग हा मुंबईत नौदलात आहे. वरुण सिंग यांच्या पश्चात पत्नी गीतांजली यांना एक मुलगा रिद रमन आणि मुलगी आराध्या आहे.

कसा झाला होता अपघात.. कोणी-कोणी गमावला जीव?

संसदेत या दुर्घटनेची माहिती देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की, 8 डिसेंबर रोजी दुपारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर ज्यामध्ये सीडीएस बिपिन रावत होते ते क्रॅश झाले.

जनरल बिपिन रावत हे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये जाणार होते. हवाई दलाच्या Mi 17 हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून 11.48 वाजता उड्डाण केले होते. दुपारी 12:15 वाजता त्यांना वेलिंग्टनला उतरायचे होते. पण दुपारी 12.08 वाजता त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं.

group captain varun singh died was injured in a helicopter accident along with cds bipin rawat
Helicopter Crash: CDS बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू; हेलिकॉप्टर दुर्घटनेत रावत यांच्या पत्नीसह 13 जण ठार

या अपघातात सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल.एस. लिडर यांच्यासह तब्बल 13 जणांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर त्यातील एकमेव बचावलेले वरुण सिंग यांचा देखील बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in