१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघे अटकेत, गुजरात एटीएसची कारवाई

१९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबई हादरली होती
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघे अटकेत, गुजरात एटीएसची कारवाई
Gujarat ATS has arrested four accused in the 1993 Mumbai Blast Case

गुजरात एटीएसएने (Gujrat ATS) मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी (1993 Bombay Serial Blasts) चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांचीही कसून चौकशी करण्यात येते आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या चौघांना आज अटक करण्यात आली ही माहिती ANI ने दिली आहे.

१९९३ मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट मुंबई अजूनही विसरू शकलेली नाही. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. देशातली सर्वात मोठी घटना म्हणून त्यावेळी या घटनेकडे पाहिलं गेलं. त्यावेळी या स्फोटांमध्ये २५० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून जास्त लोक जखमी झाले होते. या स्फोटांच्या काळ्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण करतात.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोट प्रकरणात मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकररला २९ वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीतून अटक करण्यात आलीहोती. यानंतर आता आणखी चार जणांना गुजरात ATS ने अटक केली आहे.

गुजरात एटीएसचे डीआयजी दीपन भद्रन यांनी सांगितलं की या चौघांना आम्ही बनावट पासपोर्टच्या संशयातून ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा कळलं तेव्हा कळलं की १९९३ च्या मुंबई स्फोट प्रकरणातले आरोपी आहेत. त्यानंतर आम्ही लगेचच त्यांना अटक केली.

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक केली असून अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ ​​शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बॉम्बे बॉम्बस्फोट प्रकरणात चार फरार आरोपी दोन दशकांहून अधिक काळापासून वाँटेड होते. त्यांना दुबईतून डिपोर्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी असल्याचे सुत्रानी सांगितले आहे. अबू बकर हा कुटुंबासह मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट येथे राहात होता. स्फोटानंतर तो परदेशात पळून गेला असून तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. ज्यानंतर आता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचेही समोर आलं आहे.

मुंबईत १२ स्फोट नेमके कुठे झाले?

पहिला स्फोट- दुपारी १.३० वाजता- बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेर

दुसरा स्फोट-दुपारी २.१५ वाजता, नरसी नाथ स्ट्रीट

तिसरा स्फोट-दुपारी २.३० वाजता, शिवसेना भवन

चौथा स्फोट-दुपारी २.३३ वाजता, एअर इंडिया बिल्डिंग

पाचवा स्फोट-दुपारी २.४५ वाजता, सेंच्युरी बाजार

सहावा स्फोट-दुपारी २.४५ वाजता, माहिम

सातवा स्फोट-दुपारी ३.०५ वाजता, झवेरी बाजार

आठवा स्फोट-दुपारी ३.१० वाजता, सी रॉक हॉटेल

नववा स्फोट-दुपारी ३.१३ वाजता प्लाझा सिनेमा

दहावा स्फोट-दुपारी ३.२० वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल

अकरावा स्फोट-दुपारी ३.३० वाजता, सहार विमानतळ

बारावा स्फोट-३.४० वाजता, सेंटॉर हॉटेल, विमानतळ

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in