Gunaratna Sadavarte : ...अन् गुणरत्न सदावर्ते बनले स्वतःचेच वकील; न्यायालयात काय घडलं?

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी असलेल्या गुणरत्न सदावर्तेंना आज न्यायालयात हजर करण्यात आले...
Gunaratna Sadavarte : ...अन् गुणरत्न सदावर्ते बनले स्वतःचेच वकील; न्यायालयात काय घडलं?

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची (ST workers) बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याभोवती गुन्ह्यांचा फास दिवसेंदिवस आवळताना दिसत आहे. सिल्व्हर ओक (Sharad Pawar House) हिंसक आंदोलन प्रकरणात आज झालेल्या युक्तीवादावेळी मुंबई पोलिसांनी (mumbai police) अनेक गंभीर आरोप केले. यावेळी पोलिसांचा आरोप खोडून काढण्यासाठी सदावर्तेंना स्वतःलाच बाजू मांडावी लागली.

वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात एकीकडे महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागात गुन्हे नोंदवले जात असताना दुसरीकडे सिल्व्हर ओकवरच्या प्रकरणात ते आणखी अडचणीत येण्याची चिन्हं दिसत आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी सदावर्तेंबद्दल अनेक धक्कादायक बाबी मांडल्या.

गावदेवी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी अटक केलेल्या मनोज मुदलियार याला मंगळवारी गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवरमधील घरातून पैसे मोजण्याचं मशीन जप्त केली.

सिल्व्हर ओक बाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांकडून सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना घरातून पैसे मोजण्याचं मशीन मिळालं आहे. त्याचबरोबर केरळमधून लिमोझीन गाडी विकत घेतली असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.

त्याचबरोबर काही मालमत्ता खरेदी केल्याची माहिती असून, ही खरेदी कोणत्या पैशातून करण्यात आली याची पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे घरत सांगितलं. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांतून भायखळा येथे दुकान विकत घेतलं असल्याचाही दावाही सरकारी वकिलांनी केला.

सदावर्तेंनी मांडली स्वतःची बाजू

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचे वकील उपस्थित नव्हते. त्यामुळे सदावर्ते यांनी स्वतःच युक्तिवाद केला. ते म्हणाले की, "पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करता आहेत की, हा एक मोठा स्कॅम आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावं."

"माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

घरात सापडलेल्या नोटा मोजण्याच्या मशीनबद्दल ते म्हणाले की, "कामकाजाच्या सुविधेसाठी, ३ हजार रुपयांचं नोट मोजण्याचं मशीन घेतलं होतं. शिवाय मी ज्या मालमत्ता घेतल्या. त्या बँक व्यवहाराच्या नोंदीत आहेत. जी गाडी घेतली, ती सेकंड हॅण्ड आहे. ती माझ्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सासूबाईंना यात्रेसाठी म्हणून घेतलेली आहे. शिवाय गाडी घेतल्याची नोंद आरटीओमध्ये आहे," असा युक्तिवाद सदावर्ते यांनी स्वतःची बाजू मांडताना केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in