Crime: 33 लाखांचा गुटखा जप्त, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

Beed Crime News: केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत (आयपीएस) यांनी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
gutkha worth rs 33 lakh seized beed kaij case filed against shiv sena district chief
gutkha worth rs 33 lakh seized beed kaij case filed against shiv sena district chief

बीड: बीड जिल्ह्यातील केज उपविभागाचे आयपीएस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील नांदूरघाट आणि बीड तालुक्यातील इमामपूर रोडवरील गोडाउनवर धाड टाकून गुटखा माफियांविरुद्ध कठोर कार्यवाही करीत 33 लाख 81 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याच प्रकरणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे.

केज येथे नव्याने रुजू झालेले उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत (आयपीएस ) यांना केज आणि बीड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बीड-इमामपूर रोडवरील सलीम पेट्रोल पंपाच्या मागे वसीम शेख यांच्या जागेत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी नांदूरघाट आणि बीड-इमामपूर रोडवरील सलीम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बालासाहेब दराडे, ए. एम. सय्यद, एस. एस. जाधव, सचिन अंहकारे, एस. बी. शेंडगे, विकास चोपणे, आर. टी. भंडाने, वंजारे व पंच यांना सोबत घेऊन सरकारी व खाजगी वाहनाने घटनास्थळी जाऊन छापा मारला.

यात त्यांना नांदूरघाट येथे रामहिरी जाधव यांच्या दुकानात ठेवलेला 1 लाख 57 हजार 265 रुपयांचा मुद्देमालासह रामहरी जाधव याला ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार बाबासाहेब बांगर यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात 328, 272 आणि 273 कलमप्रमाणे रामहरी वैजेनाथ जाधव (रा. नांदूरघाट) नवसेकर (रा. चौसाळा ता. जि.बीड ) बालाजी पान मटेरियलचा दुकान मालक (रा. कळंब जि. उस्मानाबाद) यांच्याविरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

gutkha worth rs 33 lakh seized beed kaij case filed against shiv sena district chief
Gujarat ATS : गुजरातमध्ये पुन्हा 600 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आला साठा

तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुटखा प्रकरणी पोलीस जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात 328, 272 आणि 273 कलमप्रमाणे चंद्रकांत उर्फ गोट्या कानडे (रा. नांदूरघाट), महारुद्र उर्फ आबा मुळे, शेख सलीम शेख सिराज आणि कुंडलिक खांडे (शिवसेना जिल्हाप्रमुख, बीड) या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या कार्यवाहीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in