हिम्मतवाली ! कोरोनाशी लढतानाही गरजूंच्या जेवणाची घेतली काळजी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे मुंबई शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेक कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मुंबईच्या धारावी भागातील ३८ वर्षीय शाहीन जामदार यांनीही लॉकडाउन काळात गरजू लोकांच्या जेवणाची सोय करत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. इतकच नव्हे सामाजिक कार्यादरम्यान जामदार यांना कोरोनाने गाठलं, परंतू हॉस्पिटलच्या बेडवरुन त्यांनी आपलं काम सुरु ठेवत गरिबांच्या ताटात दोन घास पडतील याची काळजी घेतली.

शाहीन जामदार गेल्या २० वर्षांपासून धारावी भागात राहतात. आपल्या शेजारी पाजारी असलेल्या गरजू व्यक्तींना हॉस्पिटल मध्ये नेणं, इतर कामांत मदत करणं अशी काम शाहीन नेहमी करायच्या. सामाजिक कार्याची आवड निर्माण झालेल्या शाहीन ६ वर्षांपूर्वी एका NGO मध्ये सहभागी झाल्या. पहिल्या लॉकडाउनच्या काळात शाहीन जामदार यांनी गरजू व्यक्ती, परप्रांतीय मजूर यांना जेवणाची पाकीट, महिलांसाठी सॅनिटरी पॅड, मास्क असं वाटप केलं. यंदाच्या लॉकडाउनमध्येही शाहीन यांचं हे कार्य सुरुच आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरही शाहीन गरजू व्यक्तींशी फोनवरुन संपर्क साधत त्यांच्या जेवणाची सोय करत होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“लॉकडाउनमध्ये मी गरजू लोकांना रेशन पुरवण्याचं काम करायचे. गेल्या वर्षातही रमजानच्या वेळी आम्ही अशीच मदत केली. त्यामुळे यंदा लॉकडाउन लागल्यानंतरही मला अनेक गरजू व्यक्तींचे फोन यायला लागले. त्यांच्या घरात अन्नधान्य संपत आल्याने त्यांचा रेशनची गरज होती. म्हणून मी त्यांना यंदा रेशन पुरवण्याचा निर्णय घेतला.” मध्यंतरीच्या काळात जामदार सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होत्या. परंतू या काळातही जामदार यांचा १५ वर्षीय मुलगा आणि नवऱ्याने गरजूंना रेशन पुरवण्याचं काम सुरु ठेवलं.

शाहीन अद्याप कोरोनामधून पूर्णपणे सावरल्या नाहीयेत. आपल्या भावाच्या एका खोलीत त्या सध्या राहत असून यामधून सावरल्यानंतर आपण पुन्हा एकदा गरजूंच्या सेवेसाठी रस्त्यावर येणार असल्याचा निर्धार शाहीन यांनी बोलून दाखवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT