'जावेद हबीब केसावर थुंकला आणि नंतर केस कापले', महिलेचा आरोप, Video Viral

Jawed Habib hair Spit Controversy Viral Video: जावेद हबीबने एका महिलेच्या केसावर थुंकून तिचे केस कापल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर जावेद हबीबवर बरीच टीका सुरु झाली आहे.
'जावेद हबीब केसावर थुंकला आणि नंतर केस कापले', महिलेचा आरोप, Video Viral
hair stylist javed habib cut my hair by spitting womans allegation video viral (Video Grab)

Jawed Habib hair Spit Controversy Viral Video: प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हीडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र वागणं. जावेद हबीबने चक्क डोक्यात थुंकून केस कापल्याचा आरोप महिलेने केला आहे.

व्हीडिओमध्ये दावा केला जात आहे की, जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी चक्क थुंकीचा वापर करत आहेत. जावेद हबीब एवढ्यावरच थांबत नाही तस असंही म्हणतो की, या थुंकीत जीव आहे.

यानंतर सोशल मीडियावर जावेद हबीब याच्यावर जोरदार टीका होत आहे. दुसरीकडे हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र, Jawed Habib ची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

जाणून घ्या नेमकी घटना काय...

जावेद हबीबचा हा व्हीडिओ मुजफ्फरनगरचा आहे. व्हीडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावत आहेत. केस कापताना तो म्हणतो, 'माझे केस घाणेरडे आहेत, कारण त्याला शॅम्पू लावलेला नाही.. नीट ऐका.. आणि जर पाण्याची कमतरता असेल तर.... (असं म्हणत तो चक्क महिलेच्या केसावर थुंकला) आता या थुंकीत जीव आहे.'

यावेळी जी लोक तेथे उपस्थित होते त्यांनी जोरदार टाळ्याही वाजवल्या.. यावेळी जी महिला केस कापून घेत होती. ती या व्हीडिओमध्ये यावेळी थोडी अस्वस्थ दिसून आली. दुसरीकडे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित महिलेचीही प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ज्या महिलेच्या केस जावेद हबीब कापत होता तिचे नाव पूजा गुप्ता असे आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला म्हणते की, 'माझे नाव पूजा गुप्ता आहे, माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. मी बरौत येथील रहिवासी आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले.'

'यावेळी त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले, पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असे दाखवून दिले. मी ते हेअर कट केलं नाही, मी रस्त्यावरील केस कापणाऱ्याकडून माझे केस कापून घेईन. पण जावेद हबीबकडून नाही.'

hair stylist javed habib cut my hair by spitting womans allegation video viral
Pune: 'बहिणीच्या लग्नाला जाऊ का?,' विचारताच डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे केसच कापले!

हा व्हीडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी जावेद हबीब याच्यावर जोरदार टीका केली आहे. हा व्हीडिओ अनेकांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in