अकोला : दिव्यांग तरुणाचा बालकांवर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोल्यात एका दिव्यांग तरुणाने लहान मुलांना खाऊ आणि चॉकलेटचं आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं आहे. न्यायालयाने आरोपीला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ वर्षीय दिव्यांग तरुण आकाश बंडू डोंगरे राहतो. आकाशला एक पाय नाहीये. आकाशने आपल्याच परिसरातील १०-१२ वयोगटातील मुलांना चॉकलेट, पतंग आणि मांजाचं आमिष दाखवून अनेकदा त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं.

अकोला : सराफ व्यवसायिकावर पोलीस कोठडीत लैंगिक अत्याचार, सहा पोलिसांचं निलंबन

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध पॉस्को आणि संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT