Happy Dhanteras 2021: धनत्रयोदशीनिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

Whatsapp Quotes on Dhanteras 2021: धनत्रयोदशी हा दिवाळीतील दुसरा महत्त्वाचा सण आहे. याचनिमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि खास शुभेच्छा मेसेज पाठवा.
Happy Dhanteras 2021: धनत्रयोदशीनिमित्त  Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा
happy dhanteras 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi

Dhanteras 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) सणाला आता सुरुवात झाली आहे. दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसने झाली असून आज (2 नोव्हेंबर) धनत्रयोदशी (Dhanteras 2021) सण साजरा केला जात आहे.

कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाला जी त्रयोदशी येते त्यालाच धनत्रयोदशी म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीचा दुसरा सण हा धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण खूप शुभ मानला जातो. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी केली जाते.

दिवाळी सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य देखील पार पडतात. अशा या सणाला अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण सध्या धावपळीच्या काळात हे अनेकांना शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात.

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो.

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

आरोग्यदेवता धन्वंतरी आपल्या सर्वांना सदृढ निरोगी स्वास्थ्य व दीर्घायुष्य प्रदान करो.

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबास सुख, समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त होवो.

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत, आपल्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी नांदो, या सदिच्छेसह आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे सरकारकडून काही निर्बंध आहेत. अशातच जर आपल्याला कोरोनाच समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं आवश्यक आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. अशावेळी जर आपण दिवाळीनिमित्त जर बाहेर पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता.

happy dhanteras 2021 whatsapp  facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
दिव्यांची आरास करा, फटाके फोडणे टाळा! दिवाळीसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना

सोशल मीडियमुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Dhanteras 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

धनत्रयोदशीच्या खास सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in