Happy Navratri 2021: शारदीय नवरात्रौत्सवला सुरुवात, राज्यभरातील मंदिरंही भाविकांसाठी खुली

Ghatasthapana 2021 Muhurat: शारदीय नवरात्रौत्सवला आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच राज्यभरातील सर्व प्रार्थनास्थळं ही आजपासून खुली करण्यात आली आहेत.
Happy Navratri 2021: शारदीय नवरात्रौत्सवला सुरुवात, राज्यभरातील मंदिरंही भाविकांसाठी खुली
happy navratri 2021 Navratri festival Starting temples across state also open for devotees

कोल्हापूर: शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (7 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढचे नऊ दिवस संपूर्ण देशात अत्यंत भक्तीमय वातावरणात देवी मातेची आराधना केली जाणार आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरातील जी मंदिरं आणि प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती ती देखील आजपासून सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात भाविकांकडून एकच आनंद व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर:

नवरात्र उत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे आता सज्ज झालं आहे. अत्यंत नयनरम्य अशी आरास आणि सजावट यावेळी मंदिर परिसरात करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई महालक्ष्मी मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी ई-पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

मात्र मंदिरात साडी खण किंवा ओटीचे साहित्य नेण्यास मनाई आहे. सुमारे सहा महिने बंद राहिल्यानंतर गुरुवारीपासून नवरात्रच्या मुहूर्तावर अंबाबाई महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे.

दरवर्षी नवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त येतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून गुरुवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत देवीची काकड आरती होईल. त्यानंतर पाच वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. नवरात्राच्या पहिल्या दिवशी मंदिरात होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समिती प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, दर्शनासाठी भाविकांना www.mahalaxmikolhapur.com या लिंकवर आपलं नाव नोंदणी करावी लागणार आहे.

यावर्षी ई पास असलेल्यांनाच रांगेतून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळं ई-पास नसणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असं आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोल्हापूर शहरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चारशे होमगार्ड, दोनशे पोलीस कर्मचारी, एक पोलिस उपाधीक्षक, आठ पोलीस निरीक्षक, तसंच 25 सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांचा बंदोबस्त नेमण्यात आला.

मंदिरात आज नवरात्र उत्सवाची सुरुवात देवीची काकड आरतीने झाल्यानंतर घटस्थापनेची पूजा-अर्चा आरती इत्यादी विधी संपन्न होऊन सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाने मंदिर परिसरामध्ये तोफेची सलामी देऊन घटस्थापना नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे.

happy navratri 2021 Navratri festival Starting temples across state also open for devotees
ब्रम्हाणी रुपात कोल्हापूरच्या अंबाबाईची पहिली पूजा

तुळजापूर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन शक्ती पीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा आज संपल्याने देवीला सिंहासनावर स्थापित करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही देशातील एकमेव चल मूर्ती आहे जी सिंहसनावरून निद्रेसाठी शेजघरात पलंगावर वर्षातील 21 दिवस 3 वेळेस हलवली जाते.

हिंदू परंपरेनुसार एकदा मूर्ती स्थापित केली की ती हलवली जात नाही, मात्र तुळजाभवानी ही त्याला अपवाद असून देवीची चल मूर्ती, मूळ अष्टभुजा मूर्ती व तिच्या अभिषेक पूजेचे दर्शन आजपासून केले जाते.

Related Stories

No stories found.