Hardik Pandya : हार्दिक पंड्याजवळची 5 कोटींची दोन घड्याळं जप्त; मुंबई विमानतळावर कारवाई

कस्टम विभागाने हार्दिक पंड्याकडे विचारणा केली... समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं घड्याळं जप्त... या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू
Hardik Pandya : हार्दिक पंड्याजवळची 5 कोटींची दोन घड्याळं जप्त; मुंबई विमानतळावर कारवाई
हार्दिक पंड्याकडे या दोन्ही घड्याळांचं बिलही नव्हतं(Reuters Photo)

मागील काही दिवसांपासून खेळातील असमाधानकारक कामगिरीमुळे आणि न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आल्याने चर्चेत असलेला भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. हार्दिक पंड्याजवळून 5 कोटी रुपये किंमतीची 2 घड्याळं जप्त करण्यात आली आहे मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

यूएईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकानंतर खेळाडू माघारी फिरले आहेत. भारतीय संघातील खेळाडूही मायदेशात आले आहेत. मात्र, मायदेशात येताच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चर्चेत आला आहे.

युएईतून मुंबईत येताच हार्दिक पंड्या दोन घड्याळांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन झाल्यानंतर कस्टम विभागाकडून हार्दिक पंड्याच्या सामनाची तपासणी करण्यात आली. यावेळी हार्दिक पंड्याजवळ पाच कोटी रुपये किमतीची दोन महागडी घड्याळं सापडली.

दोन्ही घड्याळांबाबत कस्टम विभागाकडून हार्दिक पंड्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, हार्दिक पंड्याकडून समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना मिळालं नाही. त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडे या दोन्ही घड्याळांचं बिलही नव्हतं. त्यानंतर कस्टम विभागाने दोन्ही घड्याळं जप्त केली. या प्रकरणाची विभागीय चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

क्रुणाल पंड्याकडेही सापडली होती घड्याळं

हार्दिक पंड्याच्या आधी त्याचा भाऊ क्रुणाल पंड्याकडेही अशीच महागडी घड्याळं सापडली होती. नोव्हेंबर २०२०मध्ये क्रुणाल पंड्याजवळ महागडी घड्याळं मिळाली होती. त्यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (Directorate of Revenue Intelligence) रोखलं होतं. नंतर हे प्रकरण कस्टम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in