'ती म्हणाली होती माझी काळजी करू नकोस' बहिणीच्या निधनानंतर हर्षल पटेलची भावूक पोस्ट चर्चेत
हर्षल पटेल फोटो-आजतक

'ती म्हणाली होती माझी काळजी करू नकोस' बहिणीच्या निधनानंतर हर्षल पटेलची भावूक पोस्ट चर्चेत

वाचा काय म्हटलं आहे हर्षल पटेलने त्याच्या पोस्टमध्ये?

IPL २०२२ च्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या टीमसाठी खेळणारा जलदगती गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षलची बहीण अर्पिताचं निधन ९ एप्रिलला झालं.

यानंतर आयपीएल सोडून हर्षल घरी गेला होता. आता तो पुन्हा एकदा टीममध्ये परतला आहे. मात्र आता त्याची सोशल मीडियावरची एक पोस्ट चर्चेत आली आहे. हर्षल पटेलने त्याच्या बहिणीसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

हर्षल पटेल
IPL 2022 : RCB च्या हर्षल पटेलवर दुःखाचा डोंगर, मुंबईविरुद्ध सामन्यादरम्यान बहिणीचं निधन

काय आहे हर्षल पटेलची पोस्ट?

तू एक खुश राहणारी, सरळ साध्या स्वभावाची व्यक्ती होतीस. तू कठीण प्रसंगानांही हसत हसत सामोरं जाणं पसंत केलंस. शेवटचा श्वास घेईपर्यंत तू तशीच होतीस. भारतात यायच्या आधी मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळी तू मला सांगितलं होतंस की माझ्याबद्दल काळजी करू नकोस आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत कर. त्यामुळेच मी परत येऊ शकलो आणि मैदानावर उतरू शकलो.

तुझी आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही. तुला माझा अभिमान वाटत राहिल अशीच कृती मी कायम करेन. मी तुला कधीच विसरणार नाही. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.

हर्षल पटेल
IPL 2021 : हर्षल पटेलची हॅटट्रीक, मुंबईचा सलग तिसरा पराभव, RCB चा रथ विजयपथावर

आरसीबी टीमने ९ एप्रिलला मुंबई इंडियन्सच्या विरोधात सामना खेळला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या आरसीबी टीमचा विजय झाला होता. या सामन्यानंतर हर्षल पटेलला हे कळलं की त्याची बहीण या जगात नाही. त्यानंतर तो लगेच भारतात आला होता. या सगळ्यानंतर तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी झाला. १६ एप्रिलला त्याने दिल्ली कॅपटल्स विरोधात सामनाही खेळला.

IPL २०२२ च्या सिझन हर्षल पटेलने पाच सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्याने सहा विकेट काढल्या आहेत. मागच्या सिझनमध्ये त्याने आरसीबीसाठी ३२ विकेट काढल्या होत्या. हर्षल पटेल मागच्या सिझनमध्येही आरसीबीकडूनच खेळला होता. आता त्याने त्याच्या बहिणीच्या निधनानंतर लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in