...अन् डॉक्टरने चक्क शेण खाणलं, Video व्हायरल

Doctor Manoj Mittal: डॉक्टर मनोज मित्तल या व्यक्तीने शेणाचं महत्त्व समजून सांगताना चक्क शेण खाल्ल्याचं समोर आलं आहे.
haryana karnal doctor manoj mittal consumes cow dung video goes viral
haryana karnal doctor manoj mittal consumes cow dung video goes viral(फोटो सौजन्य: Twitter Video Grab)

कर्नाल (हरियाणा): हरियाण्यातील कर्नालमधील एका डॉक्टरचा व्हीडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर शेण खात असल्याचं दिसतं आहे. गायीचं शेण हे आरोग्यदायी आहे आणि त्यामुळे कर्करोगासारख्या आजारापासून बचाव होतो. असा अजब दावा या डॉक्टरने केला आहे.

अनेक जण गोमूत्र प्राशन करतात हे आपल्याला माहिती आहे पण कुणी शेण खाल्ल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार MBBS डॉक्टर मनोज मित्तल यांनी शेणाचं महत्त्व पटवून देत होते. त्याचा व्हीडिओ देखील ते शूट करत होते. त्याचवेळी त्यांनी चक्क शेण खाल्लं. त्यांनी असा दावाही केला आहे की ते गेल्या अनेक वर्षापासून गोमूत्र आणि गायीच्या शेणाचं सेवन करतात.

गायीच्या शेणात व्हिटामीन बी असल्याने रेडिएशनपासून आपला बचाव होतो आणि कर्करोगाचा सामना करवा लागत नाही असा दावा डॉक्टर मित्तल करतात. असं सांगताना ते स्वत: गौशाळेतील पडलेलं शेण खात असल्याचं दिसत आहे.

सध्या टेक्नोलॉजीच्या काळात आपण रेडिएशन येणारी उपकरणं अधिक वापरतो. ज्यामुळे आपल्याला कर्करोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. पण गायीचं शेण या जीवघेण्या रोगावर रामबाण औषध आहे. असा दावा डॉक्टर मित्तल करतात. गायीच्या शेणाचं सेवन केल्याने रेडिएशनचा विपरित परिणाम होत नाही असंही मित्तल म्हणत आहेत.

एवढंच नव्हे तर मित्तल असंही म्हणतात की, 'दररोज गायीच्या शेणाचं सेवन केल्यानंतर आपलं तन-मन पवित्र होतं, आपला आत्मा पवित्र होतो.' असा अजब दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय या डॉक्टराचं असंही म्हणणं आहे की, गायीच्या शेणाचं सेवन केल्यानंतर गर्भवती महिलेला प्रसुतीदरम्यान फारसा त्रास होत नाही. तसेच अनेक आजारापासून देखील सुटका मिळते. गायीच्या शेणात मोठ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात ऑक्सिजन असतं त्यामुळे त्याचा शरीराव चांगला परिणाम होतो म्हणून त्याचं सेवन आपण गेल्या अनेक वर्षापासून करत असल्याचं या डॉक्टरने म्हटलं आहे.

haryana karnal doctor manoj mittal consumes cow dung video goes viral
आईस्क्रीम विक्रेता करत होता कोरोना रुग्णांवर उपचार, बोगस डॉक्टरला अटक

दरम्यान, डॉ. मनोज मित्तल यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी असाही सवाल उपस्थित केला जात आहे की, शेण खाण्याचा सल्ला देणारे हे महाशय खरोखरच डॉक्टर आहेत का? तर काहींच्या मते, आयुर्वेदात गोमूत्र आणि शेण यांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना मित्तल यांनी सांगितलेल्या गोष्टी योग्य वाटत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in