...म्हणून चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार होतं; मुश्रीफांनी केला गौप्यस्फोट

मुश्रीफांचे दावे : चंद्रकांत पाटील यांनी दिली होती भाजपत प्रवेश करण्याची ऑफर : अमित शाहांमुळे पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद वाचलं
...म्हणून चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार होतं; मुश्रीफांनी केला गौप्यस्फोट
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. twitter

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दुसऱ्या घोटाळ्याच्या आरोपाला ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. यावेळी मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करत मुश्रीफांनी पाटलांचं प्रदेशाध्यपद जाणार होतं, असा दावाही केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा दुसरा आरोप केला. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबींयांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्यांनी केला. या आरोपाला हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

'किरीट सोमय्या भाजपच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहेत. ते भाजपचं टूल आहेत. खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील असून, त्यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती', असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.
हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

'चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं. माझ्या कुटुंबीयांची बदनामी करुन काही मिळणार नाही. चंद्रकात पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. पण प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झालेला आहे. तो कुणी भुईसपाट केला तर हसन मुश्रीफांनी. त्यामुळे त्यांनी मला भाजप येण्याची ऑफर दिली होती', असं मुश्रीफ म्हणाले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.
चंद्रकांत पाटील खरे मास्टरमांईड... सोमय्यांचा टूल म्हणून वापर; हसन मुश्रीफांचा पलटवार

'कोल्हापूर जिल्ह्यात भाजप शून्य झाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. आता भाजपला दहा वर्ष यश नाही, असंच त्यांना वाटतंय. प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपची अशी अवस्था झाल्यानं परवा दिल्लीत चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं. पण अमित शाहांमुळे ते बचावले. कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे मुश्रीफांना कसं थांबवायचं ही त्यांची चिंता आहे', असा दावा मुश्रीफांनी केला आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मी काय खुलासा केला होता. आयकरने धाड टाकली. आम्ही त्यांना कागदपत्रे दिली आहेत. आता किरीट सोमय्या ईडीकडे जात आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही तक्रार दिली ना? मग ते तपास करतील. तुम्ही कशाला पर्यटन करता आहात.'

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.
या सरकारमधील लोकांकडे पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा नाही: चंद्रकांत पाटील

किरीट सोमय्यांना कुणी अधिकार दिला?

किरीट सोमय्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांवरही त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. 'तुरुंगात टाकणार. घोटाळेबाज. तुम्हाला हा अधिकार कुणी दिला. न्यायाधीश झाला आहात का? तक्रार करा ना. एजंट म्हणून सुपारी दिल्यानंतर काम करा ना. बदनामीकारक वक्तव्ये कशी करता? याच्याशी शरद पवारांचा काय संबंध? यांची लायकी आहे का शरद पवारांचं नाव घेण्याची? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काय संबंध? याप्रकरणी मी उच्च न्यायालयात जाणार', असा इशारा मुश्रीफ यांनी सोमय्यांना दिला आहे.

Related Stories

No stories found.