
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसभरात राज्यात २७०१ रूग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत १७५६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात आणि मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. दिवसाला ७०० ते ८०० रूग्ण आढळू लागले होते. ती संख्या मागच्या दोन दिवसांपासून एक हजारांहून जास्त होती. आज दिवसभरात राज्यात २७०१ रूग्णांची नोंद झाली आहे तर एकट्या मुंबईत १७५६ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.
आज राज्यात २७०१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर १३२७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. मुंबईत दिवसभरात १७५६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नोंद झालेला नाही.
राज्यात १३२७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ७७ लाख ४१ हजार १४३ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के झालं आहे. राज्याचा मृत्यूदर १.८७ टक्के होता. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७८ लाख ९८ हजार ८१५ इतकी झाली आहे.
राज्यातल्या कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. राज्यात आज घडीला ९ हजार ८०६ असून मुंबईत सर्वाधिक ७ हजार सक्रिय रूग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात १४८२ सक्रिय रूग्ण आहेत.
मागच्या २४ तासात देशात नव्या रूग्णांची संख्याही वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात ५ हजार २३३ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. ही मागच्या तीन महिन्यातले सर्वाधिक रूग्णवाढ आहे. मार्चनंतर आज देशात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. देशातल्या सक्रिय रूग्णांची संख्या २८ हजारांवर पोहचली आहे. देशात २८ हजार ८५७ सक्रिय रूग्ण आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
राज्यमंत्री मंडळ बैठकीत आम्ही कोव्हिडबाबत कायमच सविस्तर अशी माहिती सादर करत असतो. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढली आहे. या ठिकाणी चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून हे प्रमाण वाढवा असं सांगण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये आठ, सहा, पाच, तीन टक्के असा पॉझिटिव्हिटी रेट आहे. सध्या फार काळजीचं कारण नाही मात्र खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.