'तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो', आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला NCB कडून अटक
'तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो', आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

क्रूजवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली आहे. शाहरुखसह आणखी ७-८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री NCB ने छापेमारी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक शाहरुखचा मुलगा आर्यन असल्याची माहिती समोर आली होती.

NCB च्या या कारवाईनंतर शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर मीडियाने गर्दी केली आहे. या धामधुमीत शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिमी ग्रेवाल यांच्या Rendezvous with Simi Grewal या कार्यक्रमाचा असून शाहरुख आणि गौरी आई-बाबा झाल्यानंतर त्यांनी ही मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत सिमी ग्रेवाल यांनी शाहरुखला, मला खात्री आहे की तू तुझ्या मुलाला बिघडवशील असं म्हटलं. ज्यावर उत्तर देताना शाहरुखने, "नाही असं काही नाहीये. मी त्याला सांगितलं की तू जेव्हा ३-४ वर्षांचा होशील त्यावेळी तू मुलींच्या मागे जाऊ शकतोस. ड्रग्ज घेऊ शकतोस, सेक्स करु शकतोस. त्याने हे लवकरात लवकर सुरु केलं तर बरं होईल", असं उत्तर दिलं.

आर्यन बिघडलेला मुलगा व्हायला हवा जर तो अगदी शहाण्या मुलासाराखा वागायला लागला तर मी त्याला घराबाहेर काढेन. माझे जे सह कलाकार आहेत ज्यांना मुली आहेत त्यांच्याकडून मला आर्यनविषयी तक्रारी ऐकायच्या आहेत असंही शाहरुख म्हणाला. त्यावेळी गमतीमध्ये बोलून गेलेल्या या वक्तव्याचा धागा पकडून आता सोशल मीडियावर शाहरुखला आणखीनच ट्रोल केलं जातंय.

'तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो', आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख 'पठाण' सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता

ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आर्यन हा शाहरुखचा मुलगा असला तरीही त्याने आतापर्यंत स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवलं होतं. कोणत्याही बॉलिवूड पार्टी किंवा अन्य समारंभांमध्ये तो दिसायचा नाही. शाहरुख सध्या NCB अधिकाऱ्यांशी संपर्कात असून सध्या काय घडामोडी घडत आहेत याबद्दल तो माहिती घेतो आहे.

'तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो', आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
क्रूज ड्रग्ज पार्टी : शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे - रामदास आठवले

Related Stories

No stories found.