Health Dept Exam Date: आरोग्य विभागाची परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये; टोपेंनी सांगितली तारीख

Health Dept Exam Date latest Update : न्यासा संस्थेनं असमर्थता दर्शवल्यामुळे अचानक रद्द करण्यात आली होती परीक्षा...
Health Dept Exam Date: आरोग्य विभागाची परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये; टोपेंनी सांगितली तारीख
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.

आरोग्य विभागातील गट क आणि गट ड प्रवर्गातील परीक्षा अचानक स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा आता ऑक्टोबरमध्ये होणार असून, परीक्षेच्या तारखेबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांची सरळ सेवा प्रक्रियेतून भरती केली जाणार आहेत. यासाठी २५ व सप्टेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, ऐनवेळ परिक्षा स्थगित करण्यात आली होती. न्यासा संस्थेमुळे परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचं सांगत लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.Rajesh Tope/twitter

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती दिली. परीक्षा १५-१६ किंवा २२-२३ ऑक्टोबर घेतली जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.
आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी ढकलली पुढे; राजेश टोपे म्हणाले 'विद्यार्थ्यांची माफी मागतो'

परीक्षा पुढे ढकलण्याचं काय सांगितलं गेलं कारण?

राज्याच्या आरोग्य विभागाने सरळ सेवा भरती प्रक्रियेची जबाबदारी न्याया या संस्थेवर सोपवलेली आहे. या संस्थेमार्फत गट क आणि गट ड प्रवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. २५ व २६ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार होती.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.
आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

दरम्यान, एक दिवस आधीच परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यामुळे परीक्षार्थींची प्रचंड हेळसांड झाली होती. न्यासा संस्थेनं परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने परीक्षा स्थगित करत असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता.

Related Stories

No stories found.